Pooja Naik: पोलिसांना अधिक वेळ का हवा आहे? 'पूजा' प्रकरणी वाल्मिकी नाईक यांचा सवाल; Cash For Job मुळे गोव्याच्या बदनामीचा आरोप

Valmiki Naik Cash For Job: त्याच प्रकरणात दुसरा एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले गेले. आता पोलिसांना अधिक वेळ का हवा आहे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
Pooja Naik Cash For Job
Pooja Naik CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: `कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईक हिच्या जबाबातून आलेल्या माहितीतून योग्य दिशेने पोलिस तपास होत नाही, असे दिसून येत आहे. या प्रकरणाने राज्याची पूरती बदनामी झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे प्रवक्ते वाल्मिकी नाईक यांनी केला.

आपच्या पणजीतील मुख्य कार्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी कुंभारजुवेतील पक्षाचे नेते मनोज घाडी यांची उपस्थिती होती.

नाईक म्हणाले की, मार्च २०२५ मध्ये आपचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी दिलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, सरकारने सांगितले की ‘कॅश फॉर जॉब'' एफआयआरमध्ये एकूण ९.२५ कोटी रुपयांचा उल्लेख होता.

तथापि, पूजा नाईकने स्वतः जवळजवळ १७.६८ कोटी रुपये दिले आहेत,असे म्हटले आहे. या घोटाळ्याअंतर्गत नोंदवलेल्या ४५ एफआयआरपैकी ती फक्त एक आरोपी आहे.

त्यामुळे या घोटाळ्यात गुंतलेली एकूण रक्कम सरकारी उत्तरात नमूद केलेल्या ९.२५ कोटींपेक्षा खूपच जास्त आहे. जवळजवळ एक वर्षापासून तथाकथित तपास सुरू असूनही सरकार या घोटाळ्याचे खरे प्रमाण का लपवत आहे?, असा सवाल त्यांनी केला.

पूजा नाईक यांनी आधीच सांगितले आहे की, त्यांनी मूळ एफआयआर अंतर्गत घेतलेल्या त्यांच्या जबाबात मंत्री आणि अधिकाऱ्यांचे नाव घेतले आहे. मग सरकारकडे असा कोणता नवीन पुरावा आहे की, ज्यामुळे त्याच प्रकरणात दुसरा एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले गेले. आता पोलिसांना अधिक वेळ का हवा आहे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, खोर्लीतील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते पास्कल फर्नांडिस यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. जेसी, लायन्स क्लब, आयएमसीचे सक्रिय सदस्य असलेले पास्कल यांनी आपण प्रथमच राजकीय पक्षात प्रवेश करीत असल्याचे सांगितले. वाल्मिकी नाईक यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com