'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Crime: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तिवरे-माशेल येथील दीपश्री सावंत गावस हिने तब्बल ४४ जणांकडून सुमारे ३ कोटी ८८ लाख रुपये घेतल्याची तक्रार म्हार्दोळ पोलिस स्थानकात नोंदविली आहे.
Cash For Job Scam, Goa Government Job Scam, Goa Job Fraud
Deepashree SawantDainik Gomatnak
Published on
Updated on

Cash For Job Scam Deepashree Sawant

फोंडा: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तिवरे-माशेल येथील दीपश्री सावंत गावस हिने तब्बल ४४ जणांकडून सुमारे ३ कोटी ८८ लाख रुपये घेतल्याची तक्रार म्हार्दोळ पोलिस स्थानकात नोंदविली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणातील हा व्यवहार रोखीने झाल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून हा प्रकार सरकारी निवृत्त अधिकारी संदीप परब यांनी उघडकीस आणला आहे.

फोंडा पोलिस स्थानकात दीपश्रीविरुद्ध उसगाव तसेच सावर्डे या दोन ठिकाणांहून पैसे घेऊन नोकरी देण्याच्या बहाण्याने पैसे लुटल्याची तक्रार नोंद झाली आहे.

पैसे दीपश्रीकडे; मध्यस्थ गोत्यात

सरकारी नोकरीसाठी इच्छुकांनी पैसे संदीप परब याच्याकडे आणून दिले. नोव्हेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत हे पैसे गोळा केले असून ते दीपश्री सावंतकडे दिलेे. ही तक्रार दाखल करण्यासाठी परब याला ॲड. शैलेश गावस यांचे सहकार्य मिळाले.

अलिशान कार, फ्लॅट आणि दागदागिने

या कारनाम्यानंतर दीपश्रीने मोठी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. महागड्या गाड्या खरेदी करण्याबरोबरच तिने अलिशान फ्लॅटचीही खरेदी केली. सोन्याचे दागिनेही मोठ्या प्रमाणात विकत घेतले. हे सर्व लोकांच्या पैशांमुळेच, असा दावा संदीप परब याने केला आहे.

Cash For Job Scam, Goa Government Job Scam, Goa Job Fraud
Goa Crime: संशयित कॉन्स्टेबलचा भाऊ अजूनही फरार! दोघी बहिणींना न्यायालयीन कोठडी; 'तो' दुर्दैवी व्हिडिओ व्हायरल

दीपश्रीने धनादेश दिले; पण वटलेच नाहीत

पैशांसाठी लोकांकडून तगादा लावला जात असल्याने जलस्रोत खात्यातील निवृत्त अधिकारी संदीप परब याने दीपश्रीकडे पैशांची मागणी केली. मात्र, तिने सुरवातीला टाळाटाळ केली. शेवटी पंचवीस लाख रुपये परत केले. काही धनादेशही दिले; पण ते वटले नाहीत, असे परब याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com