Crime News : माजोर्डा मारहाणप्रकरणी कोलवा पोलिसांत गुन्हा नोंद

शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास माजोर्डा येथील मिनिनो फर्नांडिस, बेनेडिक्टा फर्नांडिस, मेलबर्न फर्नांडिस यांच्यासह आणखी सहाजणांनी माजोर्डा समुद्रकिनाऱ्यावर जमाव केला.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Crime News : मडगाव, माजोर्डा येथील मेनिनो फर्नांडिस, बेनेडिक्टा फर्नांडिस, मेलबर्न फर्नांडिस यांच्यासह आणखी सहाजणांकडून आगुस्तिनो, फ्रँक व हेंझल डिसिल्वा यांना अपशब्द वापरुन मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी आगुस्तिनो डिसिल्वा यांच्या तक्रारीनुसार कोलवा पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. आगुस्तिनो डिसिल्वा यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेसहा

वाजण्याच्या सुमारास माजोर्डा येथील मिनिनो फर्नांडिस, बेनेडिक्टा फर्नांडिस, मेलबर्न फर्नांडिस यांच्यासह आणखी सहाजणांनी माजोर्डा समुद्रकिनाऱ्यावर जमाव केला.

संशयितांकडून तक्रारदार आगुस्तिनो व त्याचे भाऊ फ्रँक व हेंझल डिसिल्वा यांना अपशब्द वापरत मारण्याची धमकी दिली.

संशयित मेनिनो व बेनडिक्टा यांनी लोखंडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर मेनिनो यांनी आगुस्तिनो यांना छत्रीने मारहाण केल्याने त्यांना दुखापत झाली.

याशिवाय संशयितांनी वॉटर स्पोर्टससाठी वापरण्यात येणाऱ्या पॅराशूटचे नुकसान केल्याचे डिसिल्वा यांनी तक्रारीत म्हटले आहे. कोलवा पोलिसांकडून तक्रारीनंतर माजोर्डा येथील मेनिनो फर्नांडिस, बेनेडिक्टा फर्नांडिस, मेलबर्न फर्नांडिस यांच्यासह आणखी सहाजणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

याप्रकरणी पोलिस निरीक्षक थेरन डिकॉस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस संदेश गडकर तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Kudne Murder Case Goa Suspect
Goa crime
MP Viriato Fernandes on paper leak
Section 354 IPC Goa Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com