Goa Crime: ‘फ्लॅट ब्रोकर’ने लपवली ड्रग्ज माफिया अटालाची माहिती, हणजूण पोलिसांकडून गुन्हा नोंद; कारवाई टाळण्यासाठी खटाटोप

Goa Landlord Booked For Harboring Criminal: इस्रायली नागरिक यानिव्ह बेनाईम ऊर्फ अटाला या ड्रग्ज माफियाला शिवोलीत फ्लॅटवर बेकायदेशीरपणे भाडेकरू म्हणून ठेवलेल्या परम उल्हास वर्थी (सध्या रा. शिवोली) याच्याविरुद्ध हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
Goa Landlord Booked For Harboring Criminal
Goa CrimeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Case Filed Against Landlord Harboring Israeli Drug Mafia In Siolim Goa

पणजी: इस्रायली नागरिक यानिव्ह बेनाईम ऊर्फ अटाला या ड्रग्ज माफियाला शिवोलीत फ्लॅटवर बेकायदेशीरपणे भाडेकरू म्हणून ठेवलेल्या परम उल्हास वर्थी (सध्या रा. शिवोली) याच्याविरुद्ध हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सोमवारी (14 एप्रिल) त्याची चौकशी केली. संशयित अटाला हा ड्रग्ज माफिया असल्याचे त्याला माहीत नव्हते, तसेच त्याच्याकडे आधार कार्ड असल्याने भाडेकरू अटालाची माहिती देणारा ‘सी फॉर्म’ पोलिसात दिला नव्हता असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे. त्याचे हे स्पष्टीकरण समाधानकारक नसून कारवाई टाळण्यासाठी त्याचा हा खटाटोप असल्याची माहिती पोलिस सूत्राने दिली.

मूळ महाराष्ट्रीयन असलेल्या संशयित परम वर्थी याने गेल्यावर्षी जून महिन्यात ड्रग्ज माफिया अटाला याला भाडेपट्टीवर फ्लॅट दिला होता. हा फ्लॅट त्याचा नसून भाडेकरू शोधून देण्यासाठी तो ‘ब्रोकर’ म्हणून काम करतो. किनारपट्टी भागात रिक्त असलेले काही फ्लॅट मालकांकडून भाडेपट्टीवर घेऊन ते पोटभाडेकरूंना दिले आहेत. संशयित अटाला वगळता इतर सर्व भाडेकरूंची माहिती पोलिस स्थानकात ‘सी फॉर्म’ भरून दिली आहे असे चौकशीत सांगितले आहे. संशयित अटाला याची माहिती लपवण्यासाठीच त्याने पोलिसांत ती सादर केली नाही. ही माहिती दिली असती, तर पोलिस त्याच्या मागे लागले असते हे त्याला माहीत होते. त्यामुळेच जाणूनबुजून ही माहिती उघड केली नसल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

Goa Landlord Booked For Harboring Criminal
Goa Crime: दारूच्या नशेत पत्नीसोबत वाद, मृतदेहाजवळ रक्ताचे डाग; गोवा मेडिकल कॉलेजबाहेर आढळला अज्ञात मृतदेह

दरम्यान, संशयित अटाला याच्याविरुद्ध हणजूण पोलिसांत (Anjuna Police) बेकायदेशीर वास्तव्यप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली होती ती सोमवारी संपली, त्यामुळे त्याला आज म्हणजेच मंगळवारी (15 एप्रिल) कोठडी वाढवून घेण्यासाठी न्यायालयात उभे केले जाणार आहे. त्याच्याकडे कोणताच पासपोर्ट नाही त्यामुळे त्याची सुटका अटळ आहे. त्याच्याकडे सापडलेल्या आधार कार्डसंदर्भातची माहिती देण्यास ‘यूआयडीएआय’ने नकार दिल्याने अंमलीपदार्थविरोधी कक्षाने त्यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात (High Court) जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ही माहिती न मिळाल्याने तपासकामात अडचणी येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Drug Case
Liberian Drug Accused Goa
236 Grams Ganja Charas Goa
Virendra Singh Baisoya Drug Mafia Deported Dubai
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com