Casaulim Accident: वळणावर बाईकचा ताबा सुटला, गाडीवर जाऊन आदळले; कासावलीतील भीषण अपघातात 2 युवकांचा मृत्यू VIDEO

Casaulim Cuelim Accident Death: कासावली–कुयेली मार्गावर सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात झुआरीनगर येथील दोन युवकांचा मृत्यू झाला.
Casaulim Cuelim Accident Death
Casaulim Cuelim Accident DeathDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: कासावली–कुयेली मार्गावर सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात झुआरीनगर येथील दोन युवकांचा मृत्यू झाला. वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठवले.

मृतांची नावे व्यंकटेश बासरी (२४) आणि राकेश संकाप्पान्नवर (२६) अशी आहेत. हे दोघे मूळचे बागलकोट (कर्नाटक) येथील असून कामानिमित्त बिर्ला-झुआरीनगर येथे वास्तव्यास होते.

Casaulim Cuelim Accident Death
Baina Accident: बायणात भरधाव कारचा थरार! 3 वाहनांना दिली धडक; नियंत्रण जाऊन गाडी झाली पलटी

हे दोघे दुचाकीवरून आडौलेम–कुयेली अंतर्गत रस्त्याने जात असताना एका वळणावर चालक व्यंकटेश याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर समोरून येणाऱ्या टुरिस्ट कारला दुचाकीची धडक बसली. या अपघातात ते जागीच ठार झाले.

Casaulim Cuelim Accident Death
Anjuna Car Accident: हणजुणेत पर्यटकांची कार 'आऊट ऑफ कंट्रोल'! ओडिशाचे 3 जण गंभीर जखमी; मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याचा आरोप

अपघातस्थळी वाझ

कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ हे या मार्गाने जात असताना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी थांबले. रस्त्यावर हॉटमिक्स केल्यानंतर वाहनांचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, रस्ता अरुंद असल्याने वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com