Carambolim mega project
Carambolim mega projectDainik Gomantak

Carambolim: 'गरीब अडचणीत येतील, गावाचा विनाश होईल'! करमळीत ‘मेगा प्रोजेक्ट’ला विरोध; ग्रामसभेत ठराव

Carambolim mega project: करमळी पंचायत क्षेत्रात येणाऱ्या मेगा प्रोजेक्टला उपसरपंच तसेच पंच सदस्यांसह दोनशे लोकांची सभा घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकल्प रद्द करावा, असा ठराव सभेत घेण्यात आला.
Published on

तिसवाडी: करमळी पंचायत क्षेत्रात येणाऱ्या मेगा प्रोजेक्टला उपसरपंच तसेच पंच सदस्यांसह दोनशे लोकांची सभा घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या दोन दिवसांत सरपंचांनी पंचायतीने दिलेली मान्यता काढून घ्यावी व स्थानिकांना त्रासदायक ठरणारा प्रकल्प रद्द करावा, असा एकमुखी ठराव आजच्या सभेत घेण्यात आला.

यावेळी करमळी प्रभाग चारचे पंच ॲड. भुवनेश्वर फातर्पेकर यांनी सांगितले की, हा मोठा मेगा प्रोजेक्ट जवळ ७ हजार चौरस मीटर क्षेत्रात येत असून यात ८४ फ्लॅट्स व ३४ शॉप्स, असे म्हणून १३.५ हजार ‘एफएआर’ चौमी क्षेत्रफळाची जागा व्यापली जाणार आहे.

यामुळे गावात सध्या होणारे अपुरे पिण्याचे पाणी, वीज, अपुरे रस्ते, वाहतूक यावर मोठा परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. या प्रकल्पाजवळ असलेली स्मशानभूमीही धोक्यात येण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Carambolim mega project
Surla: अभिमानास्पद! खंदकातील पाणी शेतीला पुरवणारे गोवा पहिले राज्‍य; मुख्यमंत्रांच्या हस्ते स्वयंचलित प्रकल्पाचे उदघाटन

तसेच या प्रकल्पात मोठी मॉल सारखी दुकाने आल्यास स्थानिक गरिबांच्या व्यवसायावर दुष्परिणाम भविष्यात होणार आहे, असा सूर करमळी वासीयांनी व्यक्त केला. सुनील नाईक म्हणाले, आमचा विरोध डावलून हा प्रकल्प आल्यास करमळीचा विनाश होण्यास वेळ लागणार नाही.

Carambolim mega project
Surla Project: 'सुर्ला प्रकल्प रद्द करा, पर्यावरण वाचवा'! ग्रामस्‍थ व पर्यावरणप्रेमींची PM मोदी, CM सावंतांकडे आग्रही मागणी

हा विनाशकारी मेगा प्रोजेक्ट रद्द कारण्यासाठी लोकशाही पद्धतीने तसेच प्रसंगी न्यायालयातही लढा दिला जाईल, असा इशारा वकील पंच सदस्य भुवनेश्वर फातर्पेकर यांनी दिला. यावेळी माजी सरपंच मुरगांवकर, संतोष भोमकर व इतरांनी या प्रकल्पाविरुद्ध भाषणे केली. करमळीचे सरपंच कुष्टा सालेलकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अनेकदा केला. मात्र, त्यांनी कॉल स्वीकारला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com