Goa Accident: मांडवी पूलावर भीषण अपघात! खड्डे बुजविणाऱ्या मजुरांना मद्यधुंद कार चालकाची धडक; एक ठार, दोघे जखमी

Mandovi Bridge Accident: तीन मजूर मांडवी पूलावर जेट पॅचर मशीनच्या मदतीने खड्डे बुजविण्याचे काम करत होते.
Goa Accident: मांडवी पूलावर भीषण अपघात! खड्डे बुजविणाऱ्या मजुरांना मद्यधुंद कार चालकाची धडक; एक ठार, दोघे जखमी
Car Rams Into 3 labourers on Mandovi Bridge Panjim, Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Mandovi Bridge Accident

पणजी: मांडवी पूलावर मध्यरात्री भीषण अपघात झाला. मद्यधुंद कार चालकाने खड्डे बुजविणाऱ्या तीन मजुरांना जोराची धडक दिली. यात तिघेही मजूर गंभीर जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. पणजी पोलिसांनी मद्यधुंद चालकाला अटक केलीय.

अमित यादव (25) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. तर, जखमी दोन मजुरांवर बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी या अपघातप्रकरणी मद्यधुंद चालक संकेत चंद्रकांत शेट (37, रा. वळवई - फोंडा) याला अटक केली आहे.

Goa Accident: मांडवी पूलावर भीषण अपघात! खड्डे बुजविणाऱ्या मजुरांना मद्यधुंद कार चालकाची धडक; एक ठार, दोघे जखमी
Arambol: मित्रांसोबत गोव्याची ट्रीप ठरली अखेरची, समुद्रात बुडून केरळच्या तरुणाचा मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार, मांडवी पूलावर मध्यरात्री काही मजूर जेट पॅचर मशीनच्या मदतीने खड्डे बुजविण्याचे काम करत होते. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या संशयित कार चालकाने तीन मजुरांना जोराची धडक दिली. यात तिन्ही मजूर गंभीर जखमी झाले.

उपचारासाठी मजुरांना गोमेकॉत दाखल करण्यात आले. उपचारावेळी प्रकृती चिंताजनक असलेल्या अमित यादव या मजुराचा मृत्यू झाला. पोलिसांनी चालकाला अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com