
Women Died In Car Accident At Tillari Canal
सिंधुदुर्ग: पुलाला धडकून तिलारीच्या कालव्यात कार कोसळून अपघात झाल्याची घटना मध्य रात्रीच्या सुमारास घडली. यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कुडासे भोमवाडी येथे रात्री 1 च्या सुमारास हा अपघात झाला.
शुभांगी परब (रा. ओझरी-पेडणे) असे या अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी सचिन परब कार चालवत होते. सचिन अग्निशमन दलात कार्यरत आहेत. त्यांचे वडील शिवा परब यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजारी वडिलांची भेट घेऊन परब लहान भाऊ आणि आईला घेऊन कोल्हापुरातून गावाकडे येत होता. यावेळी साटेली - भेडशी येथे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.
अपघातानंतर गाडी थेट तिलारीच्या कालव्यात कोसळली, यावेळी कारमधील शुभांगी परब जखमी झाल्या होत्या. त्यांना तात्काळ साटेली - भेडशी येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यांना मृत घोषित करण्यात आले. यावेळी कारमध्ये सचिन यांचा भाऊ देखील होता. दरम्यान, सचिन आणि त्यांचा भाऊ अपघातातून सुखरुप वाचले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.