Goa Accident: वेर्णा येथील नव्या उड्डाणपुलावर भरधाव कार पलटली

प्रवासी किरकोळ जखमी
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Accident: वेर्णा येथील नव्या उड्डाणपुलावर शुक्रवारी दुपारी एका कारचा अपघात झाला. आगाशी-वेर्णा उड्डाणपुलावर वेर्णाच्या बाजूला हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेली ही कार या पुलावर पलटली.

कारचालकाचे कारवर नियंत्रण न राहिल्याने कार थेट डिव्हायडरला धडकून पलटली. सुदैवाने या अपघातात कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झालेली नाही. तथापि, त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

Goa Accident
Rohan Khaunte: होम स्टे, कॅराव्हॅन धोरण महिन्याभरात; धनुष्यबाण आकाराची इमारत, डिजिटल नोमॅड व्हिसासाठी प्रयत्न...

दरम्यान, कारचे मात्र या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. समोरची काच पूर्ण फुटली आहे. कार आणखी वेगात असती तर डिव्हायडर ओलांडून पलीकडच्या बाजूवरील रस्त्यावर गेली असती. पण डिव्हायडरला थडकून कार थांबली, त्यामुळे सुदैवाने मोठी हानी टळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Elevated Road Two Wheeler Ban
PM Modi Digital India New Chapter
16 Year Old Killed In Goa Acciden
Ponda Flyover Accident
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com