Bicholim Accident : डिचोलीत कारची वीजखांबाला धडक; खांब मोडला

Bicholim Accident : वीजप्रवाह बंद झाल्याने दुर्घटना टळली; पाचजण सुखरूप
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Bicholim Accident :

डिचोली, कारची धडक बसल्याने वीज खांब मोडण्याची घटना शुक्रवार, १० रोजी डिचोलीत घडली. या अपघातानंतर लगेचच वीजप्रवाह बंद झाल्याने मोठी दुर्घटना टळली आणि नशीब बलवत्तर म्हणून कारचालकासह कारमधील पाचजण सुखरूप बचावले.

या अपघातात कारच्या दर्शनी भागाची मोडतोड झाली, तर वीज खात्याचे आर्थिक नुकसान झाले. हा अपघात दुपारी मुस्लीमवाडा-डिचोली येथील मुख्य रस्त्यावर घडला.

यासंबंधीची माहिती अशी की, जीए-०३-एच-४१९१ या क्रमांकाची कार साखळीहून डिचोली शहराच्या दिशेने जात होती. मुस्लीमवाडा येथील उतरणीवर अचानक एक वृद्ध महिला रस्त्यावर आडवी आली. या महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण गेले आणि कार सरळ डाव्या बाजूच्या वीजखांबाला धडकली.

Bicholim
Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

त्याबरोबर वीजखांब अर्ध्यावरून मोडला आणि वीजतारा लोंबकळू लागल्या. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून अपघातग्रस्त कार बाजूला केली, तर वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच घटनास्थळी येऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला, असे कारचालक मेघनाथ राऊत यांनी सांगितले.

गतिरोधक उभारण्याची मागणी

ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या ठिकाणी आतापर्यंत अनेक लहान-सहान अपघात घडलेले आहेत. या परिसरात असलेल्या उतरणीवरून वाहने वेगाने डिचोलीच्या दिशेने जातात. त्यामुळे हे अपघात घडतात, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. हा अपघात घडला, त्या ठिकाणी अपघातांवर नियंत्रण येण्यासाठी गतिरोधक उभारण्याची गरज आहे, अशी मागणी स्थानिक फिरोज बेग यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com