Cape News : ग्रामीण भागात इको टुरिझमची गरज : रमेश तवडकर

Cape News : कर्ला ते किसकोंड रस्त्याच्या कामाला सुरवात
cape
capeDainik Gomantak

Cape News :

केपे, काजुगटो तसेच कर्ला या ग्रामीण भागाला निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे. याचा फायदा घेऊन या भागातील लोकांचे जीवनमान व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या भागात इको टुरिजम करण्यास चांगला वाव आहे.

या कामासाठी लोकांचे सहकार्य लाभल्यास केंद्र सरकारकडून आर्थिक मदत घेऊन हे काम होऊ शकते, असे उद्‌गार सभापती रमेश तवडकर यांनी काढले.

कर्ला ते किसकोंड रस्त्याच्या शुभारंभ कार्यक्रमात तवडकर बोलत होते. यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्‍ता, माजी आमदार प्रकाश वेळीप, वासुदेव गावकर, अटल ग्रामचे अध्यक्ष शशिकांत गावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

या रस्त्यासाठी लोकांना साठ वर्षे वाट पाहावी लागली व यात सरकारचा काहीच दोष नाही. या रस्त्याचे काम का रखडले होते हे सर्वांना माहीत आहे, असे तवडकर यांनी सांगितले.

किसकोंड, काजुगटो व कर्ला गावातील लोकांची कित्‍येक वर्षांची मागणी आज पूर्ण होत असल्याबद्दल लोकांचे अभिनंदन करीत असल्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. किसकोंड हा भाग केपे मतदारसंघात येत आहे तर कर्ला व काजुगटो हा भाग सांगे मतदारसंघात येत असल्याने माझ्यासाठीही हा रस्ता महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले.

एकजुटीने काम करावे!

गावातील विकास होण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य हे मोलाचे असून सर्व लोकांनी संघटितपणे राहून काम केल्यास गावचा विकास कोणीच रोखू शकत नाही. आज जे काम होत आहे ते लोकांच्या सहकार्यामुळे तसेच एकजुटीमुळेच. असाच गावाचा व गावातील लोकांचा विकास होण्यासाठी एकत्रित येऊन काम करावे, असे आवाहन सभापती रमेश तवडकर यांनी केले.

cape
CVoter Survey Goa: भाजप का काँग्रेस, गोव्यात लोकसभेला कोण जिंकणार? सी-व्होटर सर्व्हे काय सांगतो?

या एका वर्षात चाळीस कोटींची कामे मार्गी लागली आहेत. हा जंगली भाग असल्याने या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी बरीच पायपीट करावी लागत होती व अशा परिस्थितीतही या भागात आलेल्या दयानंद बांदोडकर विद्यालयात गेली बरीच वर्षे दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो. आता हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर गावातील विद्यार्थ्यांना व कामाला जाणाऱ्या लोकांसाठी एक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.

— सुभाष फळदेसाई, समाजकल्याणमंत्री

लोकांची प्रमुख मागणी असलेल्या रस्त्याचे काम होत असल्याने आनंद झाला असून केपे मतदारसंघातील विकासकामे करताना सरकारने कोणताच भेदभाव केला नाही. सरकारने लोकांना वीज, रस्ते, पिण्याचे पाणी या सुविधा उपलब्ध करून दिल्याच पाहिजेत व हा त्यांचा हक्क आहे. आपण विरोधी पक्षात असूनही विकासकामात कोणताच अडथळा येत नाही.

— एल्टन डिकॉस्‍ता, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com