Cape News : केपे, सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, केपे येथील संगणक शास्त्र आणि भौतिकशास्त्र विभागाने गोवा राज्य नवोपक्रम परिषदेच्या (जीएसआयएनसी) सहकार्याने त्यांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी २० डिसेंबर रोजी फातोर्डा येथील गोवा राज्य नवोपक्रम परिषदेच्या आवारात शैक्षणिक सहल आयोजित केली होती.
रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), 3D प्रिंटिंग आणि लेझर कटिंग तंत्रज्ञान यांच्या अत्याधुनिक प्रशिक्षण सत्रांचा संस्मरणीय अनुभव महाविद्यालयातील ३१ विद्यार्थी आणि ०९ सहकारी प्राध्यापकांनी प्रत्यक्षपणे अनुभवला.
विद्यार्थ्यांना नेहमीच्या चौकटीतून बाहेर पडून नाविन्यपूर्ण अनुभव घेण्याची व जिज्ञासेची जादू अनुभवण्याची संधी गोवा राज्य नवोपक्रम परिषदेच्या सहकार्यामुळे मिळाली, याबद्दल संगणक शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. फिलीप रॉड्रिक्स आणि भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रो. नारायण बांदोडकर यांनी समाधान व्यक्त केले.
शैक्षणिक सहलीचा हा परिवर्तनकारी प्रभाव आहे. हा प्रभाव शिक्षण आणि तंत्रज्ञान यामध्ये जवळीक साधणारा आहे. गोवा राज्य नवोपक्रम परिषदेने विद्यार्थी व महाविद्यालयाला केलेले सहकार्य हे बहुमूल्य स्वरूपाचे आहे.
- डॉ. जॉयदीप भट्टाचार्य, प्राचार्य
गोवा राज्य नवोपक्रम परिषदेच्या सहकार्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत जोडू शकलो. त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकलो. हा उपक्रम शैक्षणिक अवकाश विस्तृत करणारा आहे. सहभागींमध्ये कुतूहलाची भावना वाढविणारे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
- डॉ. किसन गावस देसाई, कार्यक्रमाचे समन्वयक
शैक्षणिक सहलीतील खास बाबी
जीएसआयएनसी येथील प्रोजेक्ट ऑफिसर सुदीप फळदेसाई यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकल्प योजना आणि संधींची माहिती देऊन त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रोटोटाइपिंग लॅबचे प्रमुख सिद्धांत पंजिकार यांनी अभिनव प्रकल्पांच्या संपूर्ण निर्मिती प्रक्रियेचे उत्तम सादरीकरण केले.
फोरम फॉर इन्नोवेशन इन्क्युबेशन रिसर्च अँड एंटरप्रिन्युअरशिप (FiiRE) चे इन्क्युबेशन अँड इन्नोवेशन प्रमुख किरण मेहता यांनी सहभागींना उद्योजकतेच्या आकर्षक विश्वाचा आणि आकांक्षी उद्योजकांना पुरवलेल्या पाठबळाचा परिचय करून दिला.
३D प्रिंटिंग आणि रोबोटिक्स मेंटर शिवराज नाईक यांनी रोबोटिक्सवर एक मनोरंजक सत्र घेतले. ज्यामध्ये विद्यार्थी व प्राध्यापक यांना लेझर कटिंग तंत्रज्ञान, ३D प्रिंटिंग आणि रोबोटिक्स यांचे ज्ञान अनुभवायला मिळाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.