Crime News : बेडकांची शिकार करणारे दोघे किटलमध्ये जेरबंद

Crime News : त्‍यांच्‍याकडे चार बेडूक सापडले. या दोघांवरही वन्‍यजीव संरक्षण कायद्याच्‍या ९ व ३९ कलमांखाली गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.
cape
capeDainik Gomantak

Crime News :

मडगाव, पहिल्या पावसात प्रजोत्पादनासाठी शेतात येणाऱ्या बेडकांची गोव्यात मोठ्या प्रमाणात शिकार होत असून किटल-केपे येथील आळारे-तळप येथे बेडकांच्या शिकारीला गेलेल्या दोघांना वन खात्याच्या गस्ती पथकाने रंगेहाथ पकडले.

त्‍यांच्‍याकडे चार बेडूक सापडले. या दोघांवरही वन्‍यजीव संरक्षण कायद्याच्‍या ९ व ३९ कलमांखाली गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

अटक केलेल्यांची नावे उल्डेरीक फर्नांडिस आणि जेम्स परेरा अशी असून ते दोघेही वेळ्ळी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. हे बेडूक पकडण्यासाठी त्यांनी बरोबर घेतलेली हेडलाईट टॉर्च वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केली.

cape
INDIA Alliance In Goa: गोव्यात इंडिया आघाडीचा आत्मविश्वास वाढला; विधानसभेत 30 जागा जिंकण्याचा दावा

पिसोर्णे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. ही कारवाई वन्‍य विभागीय अधिकारी नारायण वायंगणकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली वन्‍य अधिकारी सुनील वेळीप आणि वन्‍य गार्ड शैलेश देसाई यांच्‍या पथकाने केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com