Cape News : बाबूंच्‍या समर्थकांची मनधरणी! नाराजी दूर करण्‍याचा प्रयत्‍न

Cape News : केपे मतदारसंघात भाजपचा प्रचार सुरू
Cape
CapeDainik Gomantak

Cape News :

कुंकळ्‍ळी, लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोव्‍यातून भाजपने उमेदवारी नाकारल्‍यामुळे बाबू कवळेकर यांचे समर्थक नाराज बनले आहेत.

या पार्श्वभूमीवर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार दिगंबर कामत, पक्षाच्या उमेदवार पल्लवी धेंपे व इतर नेत्यांनी कवळेकर यांच्‍या घरी जाऊन बाबू समर्थकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वतः बाबू कवळेकर, मुख्यमंत्री व इतर नेत्यांनी पक्षाचा निर्णय सर्वांनी मान्‍य करण्‍याचे आवाहन केले.

Cape
Gorakhpur To Goa Train: गोरखपूर ते गोवा रेल्वे धावणार; तयारीला वेग, एप्रिलमध्ये महत्वाची बैठक

भाजपने आज केपे मतदारसंघात लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. रविवार दि. ३१ रोजी पक्ष.नेत्यांनी आपल्या दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार पल्लवी धेंपे यांचा कार्यकर्त्यांना परिचय करून दिला. यावेळी वरील नेते उपस्‍थित होते. त्‍यांनी श्री शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण, श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण, श्री शांतादुर्गा किटलकरीण व श्री शांतादुर्गा बाळ्‍ळीकरीण मंदिराला भेट देऊन देवीचा आशीर्वाद घेतला.

त्‍यानंतर केपे भाजप मंडळाने बाळ्‍ळी येथे आयोजित केलेल्‍या कार्यकर्ता मेळाव्‍यात मुख्यमंत्री सावंत यांनी मार्गदर्शन केले.

ते म्‍हणाले की, देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला अनेक गॅरंटी दिल्या आहेत. त्‍यामुळे गोव्‍यातील लोकसभेच्‍या दोन्‍ही जागा जिंकण्याची हमी आम्‍ही त्‍यांना देऊया.

Cape
Panaji News : करंझाळे किनारी वॉटर स्‍पोर्टस्‌ नकोच : स्‍थानिक आक्रमक

विरोधकांना अजून उमेदवार मिळत नाही. भाजपच्या डबल इंजीन सरकारने केलेल्या नेत्रदीपक विकासामुळे विरोधक फिके पडले आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी केलेली चूक केपेच्या मतदारांनी यावेळी पुन्‍हा करू नये, असे आवाहनही त्‍यांनी केले.

या मेळाव्‍याला मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दिगंबर कामत, उमेदवार पल्लवी धेंपे, नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर, विनय तेंडुलकर, नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर, खुशाली वेळीप, शाणू वेळीप उपस्‍थित होते.

विरोधकांना अजून उमेदवार मिळत नाही. भाजपच्या डबल इंजीन सरकारने केलेल्या नेत्रदीपक विकासामुळे विरोधक फिके पडले आहेत. विधानसभेवेळी केलेली चूक केपेच्या मतदारांनी यावेळी करू नये.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

दक्षिण गोव्याच्या मतदारांना यावेळी एका महिला उमेदवाराला निवडून आणून इतिहास निर्माण करण्‍याची संधी प्राप्‍त झाली आहे. पल्लवी धेंपे यांना केपेत मताधिक्क्‍य मिळणे गरजेचे आहे.

- दिगंबर कामत, आमदार

मी दक्षिण गोव्याची सुकन्या असून तुमच्‍याकडे सहकार्य व सहयोग मागण्यासाठी आले आहे, निवडून आल्यास मी मडगावात संपर्क कार्यालय उघडणार आहे. प्रत्येक मतदारसंघात पोहोचविणार आहे.

- पल्लवी धेंपे, भाजप उमेदवार

कार्यकर्ते नाराज, निरुत्साही : कवळेकर

दक्षिणेत उमेदवारी मला मिळेल अशी माझ्‍या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. पण ती फोल ठरली. त्‍यामुळे माझे कार्यकर्ते नाराज व निरुत्साही बनले. या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्‍यांचा रोष कमी करण्याचा मी प्रयत्न केला आहे. पक्षाने दिलेल्‍या उमेदवाराच्या विजयासाठी झटावे असे त्‍यांना पटवून दिले आहे, असे कवळेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com