Funny Viral Video: गोव्याला जायला Office मधून सुट्टी मिळत नाहीए; कर्मचाऱ्यांनी केले देशी जुगाड, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल

Funny Desi jugad for Goa trip: बॉस काय कारण सांगून सुट्टी घ्यावी? असे प्रश्नही कर्माचाऱ्यांसमोर असतात. यावर काही कर्मचाऱ्यांनी भन्नाट पर्याय शोधून काढला आहे.
Funny Viral Video: गोव्याला जायला Office मधून सुट्टी मिळत नाहीए; कर्मचाऱ्यांनी केले देशी जुगाड, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल
Funny Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Funny video of office hacks for a Goa trip

२०२४ वर्षातील डिसेंबरचे अखेरचे काही दिवस उरलेत, शालेय विद्यार्थ्यांसाठी नाताळच्या सुट्टया जवळ आल्यात त्यामुळे सर्वजण काही ना काही प्लानिंग करतायेत. विविध ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र कामातून सुट्टी मिळत नाहीए. वर्षाअखेर, कामाचा व्याप त्यात वरिष्ठांकडून कामाचा रेटा सुरु आहे.

डिसेंबरमध्ये गोव्याला जाण्याचा हमखास प्लान अनेकजण करत असतात. यासाठी दोन ते तीन महिने अगोदरच प्लानिंग सुरु होते. पण, सर्वांनाच सुट्टी मिळेल का? नियोजन व्यवस्थित होईल का? असे प्रश्न असतात. बॉस काय कारण सांगून सुट्टी घ्यावी? असे प्रश्नही कर्माचाऱ्यांसमोर असतात. यावर काही कर्मचाऱ्यांनी भन्नाट पर्याय शोधून काढला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतोय.

Funny Viral Video: गोव्याला जायला Office मधून सुट्टी मिळत नाहीए; कर्मचाऱ्यांनी केले देशी जुगाड, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल
Goa Today's Top News: राजकारण, गुन्हे, अपघात, क्रीडा यासह विविध क्षेत्रातील ठळक बातम्या

घरी कोणीतरी आजारी आहे. माझं हे दुखतंय, ते दुखतंय. कोणत्यातरी नातेवाईकाचे निधन झाले, अशी कारणं आता जुनी आणि रटाळवाणी झालीयेत. त्यामुळे एक कर्मचारी चक्क पायालाच मोठी दुखापत झाल्याचा बनाव करुन, मल्लमपट्टी करुन ऑफिसला जात आहे. कारमधून उतरल्यावर कर्मचारी एका पायावर चालू लागतो पण, चुकून तो दुखापत झालेल्या पायाने चालतो आणि चांगला पाय वर धरतो. सोबत असलेला मित्र त्याला डोक्यात टपली मारुन चुकीचा पाय वर धरल्याची आठवण करुन देतो.

Funny Viral Video: गोव्याला जायला Office मधून सुट्टी मिळत नाहीए; कर्मचाऱ्यांनी केले देशी जुगाड, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल
Russia Cancer Vaccine: आनंदाची बातमी! कर्करोगावरील लस तयार, रशियाचा दावा; सर्वांना मिळणार मोफत लस

दिलीप रेवकर नावाच्या व्यक्तीने हा मूळ व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ऑफिसमधून तुम्ही मोठी सुट्टी घेण्यासाठी जाता तेव्हा... असे कॅप्शन देऊन त्याने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला आहे. काहीजणांना त्याला गोव्यासाठी एक महिन्याची सुट्टी मंजूर करुन घेण्यासाठी केलेले देशी जुगाड असे म्हणत शेअर केला आहे.

डिसेंबरचा महिना संपण्यासाठी १० ते १२ दिवस शिल्लक आहेत. नव्या वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण गोव्याला जाण्याचा प्लॅन करत आहेत. ज्यांना ऑफिसमधून सुट्टी मिळत नाहीए त्यांना हा व्हिडिओ लोक शेअर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com