नवी दिल्ली: गोवा राज्य विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार एकूण मतदानाच्या सरासरी 41 टक्के मतांनी विजयी झाले आहेत, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संघटनेचे म्हणणे आहे. (Candidates won by average of 41% of total votes polled in goa assembly election)
ADR आणि गोवा इलेक्शन वॉचने 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीतील सर्व 40 मतदारसंघातील मतांचे विश्लेषण केले. 2022च्या विधानसभा निवडणुकीत 82 टक्के मतदान झाले होते तर 2017 मध्ये हा आकडा 83 टक्क्यांवर होता, असे ADR ने एका नवीन अहवालात म्हटले आहे.
ADR ने सांगितले की आठ (20 टक्के) विजेते त्यांच्या मतदारसंघातील एकूण मतदानापैकी 50 टक्के आणि त्याहून अधिक मतांनी विजयी झाले आणि 32 (80 टक्के) विजेते त्यांच्या मतदारसंघात एकूण मतदानाच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी मतांनी विजयी झाले.
40 विजेत्यांपैकी तीन महिला आहेत. त्यापैकी एकीने 45 टक्क्यांहून अधिक फरकाने विजय मिळवला आहे. महिला विजेत्यांमध्ये दिव्या विश्वजित राणे (भाजप) सर्वाधिक 61 टक्के मतांनी विजयी झाल्या आहेत. गोवा विधानसभेत 2022 मध्ये झालेल्या 9,50,445 मतांपैकी 10,62लोकांनी (1.12 टक्के) NOTA साठी मतदान झाले. या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय नोंदवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.