Canacona News : विकसित भारतासाठी एकत्र या ; चावडी येथे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Canacona News : काणकोणात दोन वर्षांत ३०० कोटींची विकासकामे
Cm Pramod Sawant
Cm Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

Canacona News :

काणकोण, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन भाजपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल चावडी येथील जाहीर सभेत केले.

‘विकसित भारत धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमांतर्गत आयोजित या जाहीर सभेला समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, माजी आमदार दामू नाईक, एनआरआय अध्यक्ष नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, भाजप प्रदेश सरचिटणीस सर्वानंद भगत उपस्थित होते.

जिल्हा पंचायत सदस्य शोभना वेळीप, शाणू वेळीप, रिवण जिल्हा पंचायतीचे जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, लोलयेंच्या सरपंच निशा च्यारी, श्रीस्थळच्या सरपंच सेजल गावकर, आगोंदच्या सरपंच प्रिटल फर्नांडिस, भाजप मंडळ विशाल देसाई, महेश नाईक, गणेश गावकर, चंदा देसाई, वृंदा सतरकर, हेमंत नाईक गावकर, दिवाकर पागी, मनुजा नाईक गावकर, रजनीश कोमरपंत, संजू मिळावे, प्रभाकर गावकर, कुंभारजुवेचे जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.

केंद्र सरकारने अनुसूचित जमातीला आरक्षण संमत केले आहे. विधानसभेत चार जागा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, काहीजणांकडून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप मडकईकर यांनी केला. सविता तवडकर यांनी नरेंद्र मोदी सरकारने विकासाची गंगा संपूर्ण भारतात चालू केली आहे, असे सांगितले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप यांचेही भाषण झाले.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारतीयांना परदेशात मानसन्मान मिळाला याची अनेक उदाहरणे आहेत, असे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई यांनी स्वागत केले.

Cm Pramod Sawant
Goa Tourism: समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्ल्यू फ्लॅग मानांकना’ची अट

‘भूमिपुत्रांचे प्रश्न सुटले याचा अभिमान’

विकसीत भारत ही संकल्पना प्रत्यक्षात काणकोण मतदारसंघात प्रामाणिकपणे राबविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना मतदारांकडे भाजपला मते द्या अशी मागणी करण्याची वेळ येणार नाही.

काणकोण मतदारसंघात गेल्या दोन वर्षांत ३०० कोटींची विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीत भूमिपुत्रांचे सर्व प्रश्न सुटले आहेत याचा अभिमान असल्याचे सभापती तवडकर यांनी सांगितले.

‘मोदींमुळे महिला शक्ती सक्षम’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला शक्तीला सक्षम केले आहे. आता पुन्हा एकदा राज्यातील महिला शक्ती जागृत झाली आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील लोकसभा निवडणूक जिंकणे आता सहज शक्य असल्याचे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.

दक्षिण गोव्यातील उमेदवार कोण हे महत्त्वाचे नाही नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करणे हे लक्ष्य ठेवणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com