Canacona: काणकोणात विजेचा लपंडाव! भूमिगत वीजवाहिन्या घालूनही रड संपेना; उच्च दाबामुळे वीज उपकरणे निकामी

Canacona Power Outrage: काणकोणात कोटी रुपये खर्चून भूमिगत वीजवाहिन्या घालूनही विजेचा लपंडाव सुरूच आहे. दिवाळीपासून दर पंधरा मिनिटांनी वीज खंडित होते.
Goa Power Outrage, Goa Canacona Light Issue
Canacona Light IssueCanva
Published on
Updated on

Canacona Light Issue

काणकोण: काणकोणात कोटी रुपये खर्चून भूमिगत वीजवाहिन्या घालूनही विजेचा लपंडाव सुरूच आहे. दिवाळीपासून दर पंधरा मिनिटांनी वीज खंडित होते. काहीवेळा उच्च दाबाचा वीजपुरवठा होतो त्यामुळे रेफ्रिजरेटर, टिव्ही यासारखी वीज उपकरणे निकामी झाल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.

भूमिगत वीजवाहिन्या घातल्यामुळे विजेचा लपंडाव कमी होऊन अखंडित वीजपुरवठा होण्याची नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, त्याचा प्रत्यक्ष फायदा मिळण्याऐवजी खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Goa Power Outrage, Goa Canacona Light Issue
Goa Tourism: विदेशी पर्यटकांची गोव्‍याऐवजी श्रीलंकेला पसंती! वाढीव व्‍हिसा शुल्‍काचा परिणाम; रशियन पर्यटकांचे मात्र प्राधान्‍य

यासंदर्भात स्थानिक वीज अभियंत्यांना विचारले असता शेल्डे येथे वीजपुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सध्या लोलये, पैंगीण, आगोंद, खोला, गावडोंगरी, खोतीगाव या भागात वीज व जलपुरवठा खात्याची बिले भरण्याची कोणतीच सोय नसल्याने वीज व जलपुरवठा ग्राहकांना चावडी येथे येऊन बिल भरणा करावा लागत आहे, त्यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Smart Meter Protest
Goa Power Department
amit patkar
Goa Smart Meter Controversy
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com