Canacona Ravindra Bhavan: ‘नटसम्राट’ने उघडणार काणकोण रवींद्र भवनचा पडदा; ३१ ऑगस्टपर्यंत कार्यक्रमांची रेलचेल

Ravindra Bhavan Canacona: मंगळवारी उदघाटन सोहळ्याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
Ravindra Bhavan Canacona: मंगळवारी उदघाटन सोहळ्याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
Ravindra BhavanDainik Gomantak
Published on
Updated on

Ravindra Bhavan Canacona Opening Ceremony

काणकोण: येथील रवींद्र भवनचे मंगळवारी (ता. २७) सकाळी १० वाजता उदघाटन करण्यात येणार आहे. उदघाटन सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, आमदार केदार नाईक, नगराध्यक्षा सारा नाईक देसाई, कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण गावडे, सचिव स्वेतिका सचन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

२७ ते ३१ ऑगस्टपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २७ रोजी संध्याकाळी ७ वा. उपेंद्र दाते दिग्दर्शित ‘नटसम्राट’ नाटक सादर करण्यात येईल. बुधवारी (ता.२८) सकाळी १० वा. पथनाट्य स्पर्धा होईल. संध्याकाळी ७ वा. व्यंकटराय नाईक दिग्दर्शित ‘दुर्गासुर वध’ हा पौराणिक खेळ सादर करण्यात येईल. गुरुवारी (ता. २९) सकाळी १० वा. लोकनृत्यांचे सादरीकरण होईल. दुपारी २.३० वा. ऑक्रेस्ट्रा होईल. संध्याकाळी ७ वा. प्रवीण गावकर आणि साथींचे शास्त्रीय गायन होईल.

शुक्रवारी (ता. ३०) सकाळी १० वा. लोकनृत्ये सादर करण्यात येतील. संध्याकाळी ७ वा. ‘गिरगिरे’ हे तियात्र सादर करण्यात येईल. शनिवारी (ता. ३१) सकाळी लोकनृत्य सादरीकरण होईल. संध्याकाळी ७ वा. जयेंद्रनाथ हळदणकर दिग्दर्शित ‘तो मी नव्हेच’ हे नाटक सादर केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com