House Fire: तेंबेवाड्यात आगीचे तांडव; घर जळून खाक झालेल्या कुटुंबाला सरकारचा मदतीचा हात

Canacona House Fire Incident: तेंबेवाडा-काणकोण येथील लक्ष्मी कोमरपंत यांचे घर गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले.
Canacona House Fire Incident
House FireDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

काणकोण: तेंबेवाडा-काणकोण येथील लक्ष्मी कोमरपंत यांचे घर गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले.

आगीत घरातील मौल्यवान वस्तू, कपडे आणि अन्य साहित्य जळून नष्ट झाले. आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण घर आणि आतील साहित्य जळून खाक झाले होते.

Canacona House Fire Incident
Goa Tourism Safety: हॉटेल बुकिंगच्या नावाखाली फसवणूक? गोवा पोलिसांकडून सायबर सुरक्षा सल्ला जारी

शुक्रवारी कला व संस्कृतीमंत्री रमेश तवडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जळालेल्या घराची पाहणी केली. या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्य निधीतून घराची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. शनिवारपासून पुनर्बांधणीच्या कामाला सुरवात केली जाईल, अशी माहिती मंत्री तवडकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.