Ganesh Chaturthi: गाजावाजा केला, पण काणकोणातल्या बाजाराचे गणित फसलेच

Ganesh Chaturthi: कदंब बसस्थानकाच्या बाहेर भरविण्‍यात आलेल्या स्वयंपूर्ण चतुर्थी बाजारात शुकशुकाट
स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार
स्वयंपूर्ण चतुर्थी बाजारDainik Gomanta
Published on
Updated on

Canacona: मोठा गाजावाजा करून काणकोणात सुरू केलेल्या चावडी व पैंगीण येथील स्वयंपूर्ण चतुर्थी बाजाराचे गणित फसले आहे. या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या वस्तूंच्‍या दरावर नियंत्रण नसल्याने ग्राहकांनी या बाजाराकडे पाठ फिरवली आहे. माटोळीचे सामान तर दामदुप्पट दराने विकण्यात येत आहे.

स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार
Mosquitoes Bite: डास चावल्यामुळे होते जळजळ ? करून बघा हे घरगुती उपाय

या बाजारात कांगणी, खिळखिळे, माडतचे कात्रे यासारखे माटोळीचे सामान 30 रुपये चुडी दराने विकले जात आहे. त्यात लहान चुडीमध्ये सामानही कमी असते. स्वंयपूर्ण बाजारात सामान विक्रीस बसणाऱ्या स्वंयसहाय्य गटांना व अन्य विक्रेत्याना सोपो करातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी मालाची विक्री वाजवी दरात करून या महागाईच्या काळात नागरिकांना दिलासा द्यावा हा त्यामागील सरकारचा हेतू होता. मात्र मुख्य हेतूलाच बगल देण्यात आली आहे.

स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी; पोलिस व परिवहन विभागाकडे पासेस, स्टिकर्स उपलब्ध

काणकोणात आज शनिवारी आठवड्याचा बाजार होता. या बाजारात गणेश चतुर्थीसाठी लागणारी फळफळावळ व भाजी खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. २० ऑगस्टपासून या बाजाराला सुरूवात झाली, मात्र चतुर्थीचा बाजार यंदा ३१ तारखेला चतुर्थी असल्याने तीन दिवस अगोदर भरणार आहे. मात्र दरावर नियंत्रण गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com