Canacona News : लोलयेत भगवती पठारावर साकारणार भव्य ‘फिल्मसिटी’ ; उद्या बैठक कोमुनिदादचा प्रस्ताव

सरकारने राजपत्रात ज्या संस्था किंवा व्यक्तीकडे १० लाख चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन आहे, त्यांनी फिल्मसिटीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले होते.
bhagwati plateau  film city
bhagwati plateau film cityDainik Gomantak
Published on
Updated on

canacona News : काणकोण, भव्य अशी फिल्मसिटी उभारण्यासाठी लोलये कोमुनिदाद संस्थेने भगवती पठारावरील २५० एकर (१० लाख चौरस मीटर) जमीन देण्यास संमती दर्शविणारा प्रस्ताव गोवा मनोरंजन सोसायटीकडे सादर केला आहे.

यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी रविवारी (ता. १५) सकाळी १० वाजता लोलये येथे भागधारकांची बैठक बोलाविली आहे, असे कोमुनिदाद संस्थेचे भूषण प्रभूगावकर यांनी सांगितले. लोलये-पोळे कोमुनिदाद संस्थेचे अध्यक्ष विश्वजीत वारीक असून मुखत्यार रमाकांत प्रभूगावकर हे आहेत.

सरकारने राजपत्रात ज्या संस्था किंवा व्यक्तीकडे १० लाख चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन आहे, त्यांनी फिल्मसिटीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले होते.

त्यानुसार लोलये कोमुनिदाद संस्थेने सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. यापूर्वी जुलै महिन्यात समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी या पठाराची पाहणी केली होती.

त्यावेळी लोलये पंचायत क्षेत्रातील भगवती पठारावर सर्वांना विश्‍वासात घेऊन ग्रीन प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे, असे मंत्री फळदेसाई यांनी काणकोण येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले होते.

bhagwati plateau  film city
Cancona News: सहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करणार्‍या शिक्षकाला जामीन मंजूर; काणकोण येथील घटना

जलपुरवठ्यावर परिणाम नाही

भगवती पठारावर प्रदूषण मुक्त प्रकल्पांचा विचार करण्यात येत आहे. या प्रकल्पांमुळे पर्यावरणाला अजिबात धोका पोचणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. शिवाय काणकोणमधील जल पुरवठ्यावरही कोणताच परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

ही जमीन लोलये-पोळे कोमुनिदादच्या मालकीची असून या जमिनीच्या वापरासंबंधी कोमुनिदादच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे.

भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यापूर्वी या पठारावर आयआयटी प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, ग्रामस्थांनी त्याला विरोध दर्शविला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com