Canacona: ..आणखी एका डॉल्फिनचा मृत्यू! काणकोण किनाऱ्यावर वाढत्या घटना; कारण अस्पष्ट

Goa Dolphin Death: मृत डॉल्फिन माशांची बाणावलीच्‍या व्‍हॅटर्निटी इस्‍पितळात शवचिकित्‍सा करण्‍यात आली अशी माहिती दक्षिण गोव्‍याचे किनारपट्टी वनाधिकारी राजेश नाईक यांनी दिली.
Canacona Dolphin Death
Goa Dolphin DeathDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : काणकोणातील समुद्रकिनाऱ्यावर जलचर प्राणी मरून पडण्‍याच्‍या घटनांत अलीकडच्‍या काळात विलक्षण वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी गालजीबागच्‍या किनाऱ्यावर आणखी एक मृत डॉल्फिन येऊन पडला.

तो सुमारे दोन महिन्‍यांचा होता. अत्‍यंत कुजलेल्‍या अवस्‍थेत तो किनाऱ्यावर येऊन पडला. काणकोण भागातील किनाऱ्यांवर असे मृत जलचर सापडण्‍याची जुलै महिन्‍यापासून ही तिसरी घटना आहे. यापूर्वी १३ जुलै आणि ३१ जुलै रोजी आगोंद किनाऱ्यावर मृत डॉल्फिन सापडले होते.

Canacona Dolphin Death
Canacona: गटार बुजवले अन् घरात घुसले पाणी; चावडी- काणकोण येथील घटना; साहित्य खराब होऊन कुटुंबाला मनस्ताप

त्‍यामुळे हा चिंतेचा विषय बनला आहे. या मृत डॉल्फिन माशांची बाणावलीच्‍या व्‍हॅटर्निटी इस्‍पितळात शवचिकित्‍सा करण्‍यात आली अशी माहिती दक्षिण गोव्‍याचे किनारपट्टी वनाधिकारी राजेश नाईक यांनी दिली.

Canacona Dolphin Death
Cancona: चिंताजनक! काणकोणात शेकडो हेक्टर शेतजमीन पडिक! कुळकायदे, भटक्या गुरांची समस्या

मात्र, हा डॉल्फिन अत्‍यंत कुजलेला असल्‍याने त्‍याचा मृत्‍यू नेमका कोणत्‍या कारणामुळे झाला हे समजू शकले नाही अशी माहिती त्‍यांनी दिली. सध्‍या पावसामुळे समुद्र खवळलेला आहे. त्‍यामुळेही लाटांचे तडाखे बसून डॉल्फिन मृत होऊ शकतात अशी शक्‍यता त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com