Canacona News : काणकोणात भाजपविरोधातील शक्ती एकत्र : प्रशांत नाईक

Canacona News : आज या सर्वच शक्ती एकत्र आल्या आहेत, असे गोवा फॉरवर्ड चे नेते प्रशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Canacona
Canacona Dainik Gomantak

Canacona News :

काणकोण, मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला आहे, असे म्हणणाऱ्या नेत्यांनी गेल्या निवडणुकीत किती मते भाजप विरोधात होती, हे पहावे.

आज या सर्वच शक्ती एकत्र आल्या आहेत, असे गोवा फॉरवर्ड चे नेते प्रशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी इंडिया अलायन्सचे भागीदार आपचे स्थानिक नेते संदेश तेलेकर,गोवा फॉरवर्डचे विकास भगत, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र देसाई, कॉंग्रसचे मतदार संघ अध्यक्ष मास्टर कुतिन्हो, कॉंग्रेसचे जनार्दन भंडारी उपस्थित होते. तृणमूल कॉंग्रेसचे महादेव देसाई काही कामानिमित्त पत्रकार परिषदेला येऊ शकले नसल्याचे विकास भगत यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेपूर्वी सर्व५९ बुथवरील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना कामाची जबाबदारी वाटून दिल्याचे भगत यांनी सांगितले. काणकोणात गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला मताधिक्य मिळाले नव्हते.

Canacona
Kolhapur-Goa: कोल्हापूरच्या महिलेने पोटच्या मुलीला एक लाख रुपयांना गोव्यात विकले, नोटरीद्वारे झाला व्यव्हार

मात्र, यावेळी मताधिक्य खेचून आणण्याचा प्रयत्न ‘इंडिया’ चे सर्व भागीदार करणार असल्याचे जनार्दन भंडारी यांनी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारा विरोधात इजिदोर फर्नांडिस,विजय पै खोत हे बलाढ्य उमेदवार उभे राहिले होते.

लोकसभा निवडणुकीत ते तुम्हाला साथ देतील का, असे विचारले असता इंडिया अलायन्सच्या उच्च नेत्यांकडून हा प्रयत्न चालू असल्याचे प्रशांत नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com