Benaulim Garbage Problem: बाणावलीत उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध स्वयंसेवकांची मोहीम; एकाला रंगेहात पकडले अन् पुढे त्यालाच...

बाणावलीमधील सुमारे 20 स्वयंसेवकांच्या पथकाने दोषींना पकडण्यासाठी रस्ते आणि शेतांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे.
Benaulim Garbage Problem
Benaulim Garbage ProblemFile Photo

Benaulim Garbage Problem: गोव्यात अनेक ठिकाणी अज्ञांताकडून कचरा टाकण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून उघडकीस आले आहेत.

बाणावलीमध्ये देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. कचरा टाकण्यात येत असलेल्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी बाणावलीमधील सुमारे 20 स्वयंसेवकांच्या पथकाने दोषींना पकडण्यासाठी रस्ते आणि शेतांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे.

Benaulim Garbage Problem
Panji News : विधवा प्रथेविरोधात कायदा करणे काळाची गरज

मंगळवारी, त्यांनी गुप्तपणे कचरा टाकत असलेल्या आणखी एका व्यक्तीला पकडले आणि त्याला तो परिसर स्वच्छ करायला लावला आणि त्याला अधिकार्‍यांकडे सोपवण्याआधी रस्त्याच्या कडेला उगवलेली झुडपे देखील छाटण्याची शिक्षा त्याला देण्यात आली.

विशेष म्हणजे हे पथक गावकऱ्यांनी स्वत: बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने कचरा फेकणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहे. या स्वयंसेवकांनी डिसेंबर 2022 पासून आतापर्यंत 15 घटनांमध्ये अनेकांना रंगेहाथ पकडले आहे.

दरम्यान, स्थानिक सरकारी अधिका-यांनी उघड्यावर कचरा टाकण्यापासून रोखण्यासाठी अद्याप कृती आराखडा तयार केलेला नाही. हे स्वयंसेवक परिसरातील इतर भागांवरही लक्ष ठेऊन असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com