कॅम्प अर्बन कॉप रेटीव्ह क्रेडिट सोसायटीची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पडली पार

कोविड काळाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे संस्थेच्या नफ्यात तूट आली असली तरी यावर्षी 5 लाख 53हजार 913 रू नफा झाला आहे
Urban Cop Retive Society

Urban Cop Retive Society

Dainik gomantak

Published on
Updated on

मोरजी morjim : आगरवाडा येथील कॅम्प अर्बन कॉप रेटीव्ह क्रेडिट सोसायटीची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार 19 रोजी खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेला ऑडिटर ने अ दर्जा दिल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

येथील श्री मारुती देवस्थान सभागृहात कॅम्प अर्बन चे अध्यक्ष रवींद्र राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला उपाध्यक्ष विठोबा बगळी, सचिव दयानंद मांद्रेकर, संचालक सर्वश्री अमोल राऊत, जयानंद गावकर, महेश परब, आदी उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Urban Cop Retive Society</p></div>
'आर्मी व पोलीस सैनिकांमुळे जनता सुखाची झोप घेते'

प्रारंभी सचिव दयानंद मांद्रेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले संस्थेचे अध्यक्ष रवींद्र राऊत यांनी अहवाल सादर केला तसेच भागधारकांना लाभांश जाहीर केला. कोविड (covid) काळाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे संस्थेच्या नफ्यात तूट आली असली तरी यावर्षी 5 लाख 53हजार 913 रू नफा झाला आहे तसेच संस्थेने 10 लाख पर्यंत कर्ज मर्यादा वाढवली आहे संस्थेच्या आगरवाडा,. कोरगाव आणि केरी - तेरेखोल याठिकाणी शाखा आहेत मार्च अखेर पर्यंत संस्थेचे ऐकूण 3540 इतके सभासद आहेत.

संस्थेतर्फे सोने तारण कर्ज, वाहन कर्ज, कांझुमार डुरेबल लोन, माईक्रो फायनान्स, (finance) आदी कर्ज पुरवठा करण्यात येतो संस्थेने कर्ज वसुली साठी विशेष पावले उचलली असून कर्ज वसुली साठी खास अधिकारी नेमला आहे त्याच्या मार्फत पाठपुरावा केला जातो मोठ्या प्रमाणात कर्ज थकबाकी असलेल्या कर्जदरावर पेडणे न्यायालयात केसेस दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यामुळे वसुलीच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे अध्यक्षांनी यावेळी भागधारकांना सांगितले .

सामाजिक बांधिलकीतून संस्थे तर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्यात 10 आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांचा गौरव, गोवा राज्य सहकार संघाच्या सहकार्याने सहकार सप्ताह आयोजित करणे तसेच पाणी, वीज बिल आदी उपक्रम राबविले जातात. असे सांगितले भागधारकांच्या सहकार्याने संस्थेने प्रगती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

यावेळी झालेल्या चर्चेत म्याथू फर्नांडिस, नितीन शेट गावकर, सखाराम नागवेकर, प्रकाश बगळी, नंदकुमार राऊत,रामा आगरवाडेकर, अंकुश बुगडे, नाझरेत फर्नांडिस सुमन खोर्जुवेकर, विनिता बगळी यांनी भाग घेतला. सुरवातीला संस्थेचे दिवंगत सचिव संतोष चोडणकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शेवटी उपाध्यक्ष विठोबा बगळी यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com