Goa Marathi Academy: गोवा मराठी अकादमीतर्फे पुरस्कारांसाठी आवाहन

Marathi Literature Award: स्वायत्त परीक्षक मंडळातर्फे पुस्तकांचे परीक्षण करून हे पुरस्कार दिले जातील
Marathi Literature Award: स्वायत्त परीक्षक मंडळातर्फे पुस्तकांचे परीक्षण करून हे पुरस्कार दिले जातील
Marathi Books Canava
Published on
Updated on

गोवा मराठी अकादमीतर्फे गोमंतकीय मराठी साहित्यिकांच्या मराठी साहित्यकृतींसाठी पुरस्कार योजना सुरू करण्यात आली होती. या पुरस्कारांतर्गत यावर्षी पुढील वाङ्मयप्रकारांसाठी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

१. कथा / कादंबरी २. ललित गद्य ३. कविता ४. नाटक / एकांकिका ५. चरित्र ६. संपादन ७. समीक्षा / वाङ्मयीन संशोधन ८. आत्मचरित्र / आठवणी ९. इतिहास संशोधन १०. संकीर्ण. गोवा मराठी अकादमीतर्फे नियुक्त करण्यात येणाऱ्या मान्यवर साहित्यिकांच्या एका स्वायत्त परीक्षक मंडळातर्फे पुस्तकांचे परीक्षण करून हे पुरस्कार दिले जातील.

Marathi Literature Award: स्वायत्त परीक्षक मंडळातर्फे पुस्तकांचे परीक्षण करून हे पुरस्कार दिले जातील
Marathi Sahitya Sammelan - काणकोण येथील मराठी साहित्य संमेलन | Gomantak TV

रोख १० हजार रूपये व प्रशस्तिपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप असेल. गोमंतकीय मराठी साहित्यिकांच्या साहित्यकृतीच या पुरस्कारांसाठी पात्र ठरतील. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा यंदाच्या पुरस्कारांसाठी विचार करण्यात येईल.

गोमंतकीय साहित्यिकांनी आपल्या वरील काळात प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींच्या तीन प्रती गोवा मराठी अकादमी, तिसरा मजला, शिक्षण खात्याची जुनी इमारत, १८ जून मार्ग पणजी या पत्त्यावर १५ जुलैपर्यंत पाठवावे, असे आवाहन अकादमीतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Best Wedding Destination Award
Mahadev Shinde National Teacher Award 2026
Esakal No. 1 Marathi Website
Virat Khdapkar six year old Goa boy Kedarnath world record
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com