Calangute: रस्ता रुंदीकरणास अडथळा! मार्ना-शिवोली बाजारातील दुकानदारांना नोटिसा, मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्याची सूचना

Calangute Siolim Shop Ownership Documents: शिवोलीतील पोर्तुगीजकालीन मार्ना - बाजारपेठेतील दुकानदारांना स्थानिक पंचायतीने नोटिसा जारी केल्या आहेत.
Calangute
CalanguteDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: शिवोलीतील पोर्तुगीजकालीन मार्ना - बाजारपेठेतील दुकानदारांना स्थानिक पंचायतीने नोटिसा जारी केल्या असून दुकानदार चालवीत असलेल्या दुकानांचा तपशील तसेच दुकानांचा मालकी हक्क दाखविणारी कागदपत्रे घेऊन पंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरणारी बेकायदेशीर घरे, आस्थापने, तसेच दुकानांचे स्थानिक पंचायती तसेच नगरपालिकांकडून सर्वेक्षण सुरू असून त्या अनुषंगाने या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

पंचायत संचालकांच्या निर्देशानुसार स्थानिक पंचायत मंडळाकडून येथील दुकानदारांना जारी करण्यात आलेल्या नोटिसा पाहून बहुतेकांची पायाखालची वाळू सरकू लागल्याचे या भागाचा दौरा केला असता दिसून आले. इतकी वर्षे दुकानांच्या भरवशावर आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करणाऱ्या अनेकांनी पोर्तुगीजकालीन कागदपत्रे शोधण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

Calangute
Kala Academy: गोविंद गावडेंना आणखी एक धक्का; मुख्यमंत्र्यांनी हाती घेतली कला अकादमीची सूत्रे, अध्यक्षपदी निवड

मार्ना बाजारातील दुकानदारांशी संपर्क साधला असता बहुतेक दुकानांचे मूळ मालक सध्या हयात नसल्याचे आढळून आले, परंतु मूळ मालकांच्या परवानगीनेच आपण गेली कित्येक वर्षे या भागात व्यवसाय करत आहोत. त्यामुळे स्थानिक पंचायत मंडळ तसेच सरकारकडून आपणा सर्वांच्या दुकानांना अभय मिळवून देण्याची जोरदार मागणी दुकान मालकांकडून करण्यात येत आहे.

Calangute
Goa Rain: गोव्यात मान्सूनचा जोर वाढणार! IMD कडून पुढील 4 दिवस मध्यम पावसाचा अंदाज; यलो अलर्ट जारी

उड्डाणपुलाची मागणी

आमचे पूर्वज पोर्तुगीज काळापासून येथील स्थानिक चर्चच्या सहकार्याने या भागात असलेल्या मार्ना बाजारात व्यवसाय करीत होते. कालांतराने विकासाच्या नावाखाली दर पाच वर्षांनी रस्त्याचे रुंदीकरण होऊ लागले आणि रस्ताच आमच्या दुकानांत घुसला. या गोष्टीचा सारासार विचार करून सरकारने पुढील कृती करावी अन्यथा या भागातून वाहतुकीच्या सोयीसाठी छोटासा उड्डाणपूल उभारून मार्ना बाजार पूर्ववत ठेवावा, असे येथील बहुतेक बाजारकरांनी दै. ‘गोमन्तक’ला सांगितले.

समाजात काळानुसार बदल घडत असतो आणि तो आवश्यक असतो, परंतु गावचा विकास तसेच प्रगती साधताना कुणाच्याच पोटावर लाथ बसणार नाही या गोष्टीचा प्रामुख्याने विचार होणे आवश्यक आहे. सर्वबाबतीत समतोल राखूनच मार्ना - शिवोली येथील बाजारपेठेचा विषय हाताळण्यात येईल. पंचायत मंडळासाठी उच्च न्यायालयाfrwचा आदेश शिरसावंद्य आहे. - अमित मोरजकर, सरपंच, मार्ना-शिवोली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com