Calangute Crime: रात्री पकडला महिलेचा हात, मित्रांना केली मारहाण; कळंगुट छेडछाड प्रकरणात पुन्हा आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश

Goa Crime: न्यायालयाने दिलेल्या आदेशात अतिरिक्त सत्र न्यायाधीश अपूर्वा नागवेकर यांनी स्पष्ट केले की, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ नुसार, अशाप्रकारचे आरोपपत्र ‘जेएमएफसी’ न्यायालयात दाखल होणे आवश्यक आहे.
Court Order
CourtCanva
Published on
Updated on

पणजी: कळंगुट येथील ‘जस्ट लोबो रेस्टॉरंट’ परिसरात ऑक्टोबर २०२४ मध्ये घडलेल्या कथित छेडछाड आणि मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता सत्र न्यायालयात दाखल केल्याचे निदर्शनास आल्याने अतिरिक्त सत्र न्यायालयाने ते परत केले आहे. हे आरोपपत्र न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयात पुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.

एका महिलेकडे लैंगिक स्वरूपाची मागणी करत असल्याचा आरोप प्रेम कुमार पांडे, कृष्णा कुशवाह आणि दीपक कुमार यांच्यावर केला आहे. तसेच तिच्या पुरुष मित्रांना मारहाण केल्याचा आरोपदेखील संशयितांवर आहे.

Court Order
Goa Crime: गोव्यात आला कामाच्या शोधात, सोबत आणला गांजा; ओडिशातील 29 वर्षीय युवकाच्या आवळल्या मुसक्या

१३ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री संशयितांनी संबंधित महिलेचा हात पकडत तिच्याकडे लैंगिक स्वरूपाची मागणी केली होती. महिलेचे मित्र हस्तक्षेप करण्यास आले असता संशयितांनी त्यांना मारहाण केल्याचेदेखील आरोपपत्रात नमूद आहे. संशयितांवर भारतीय न्याय संहितामधील विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.

Court Order
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

यात कलम ७५ चा समावेश असून, यात गंभीर स्वरूपाच्या लैंगिक गुन्ह्यांचे खटले सत्र न्यायालयात चालविणे सक्तीचे असते, न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने दिलेल्या आदेशात अतिरिक्त सत्र न्यायाधीश अपूर्वा नागवेकर यांनी स्पष्ट केले की, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ नुसार, अशाप्रकारचे आरोपपत्र ‘जेएमएफसी’ न्यायालयात दाखल होणे आवश्यक आहे. मात्र, पोलिसांनी ही अनिवार्य प्रक्रिया न पाळता आरोपपत्र थेट सत्र न्यायालयाकडे पाठवले. तपास अधिकाऱ्यानेही त्यांच्या उत्तरात ही प्रक्रिया ‘चुकीने आणि अनावधानाने’ घडल्याचे मान्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com