Tenant Verification in Calangute: कळंगुटमध्ये 300 अवैध भाडेकरूंना पोलिसांचा दणका! 24 तासात प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा...

या लोकांनी अनिवार्य भाडेकरू पडताळणी फॉर्म (Tenant Verification Form) सादर केला नव्हता.
Tenant Verification in Calangute
Tenant Verification in CalanguteFile Photo
Published on
Updated on

Calangute Police Special Drive for Tenant Verification: कळंगुट पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेंतर्गत त्यांच्या कार्यक्षेत्रातामध्ये 300 भाडेकरू अवैधरित्या राहताना आढळून आले.

या लोकांनी अनिवार्य भाडेकरू पडताळणी फॉर्म (Tenant Verification Form) सादर केला नव्हता. त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Tenant Verification in Calangute
जेज्युईटांचे स्थानिक प्रजेसोबत होते सौहार्दाचे संबंध; झेवियर इतिहास संशोधन केंद्र

घरमालकांनी कुणालाही घर भाड्याने देण्यापूर्वी त्यांच्याकडून भाडेकरू पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, यासाठी कळंगुट पोलिसांतर्फे ही मोहीम राबवण्यात आली.

प्रामुख्याने स्थलांतरित आणि आंतरराज्यीय कामगार अशा खोल्यांमध्ये वास्तव्यास येतात, आणि ते कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत नाहीत.

तसेच बऱ्याचदा, या परप्रांतीय भाडेकरूंचा गोव्यात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. कळंगुट-कांदोळी परिसरात भाडेतत्वावर बेकायदेशीरपणे राहणाऱ्या स्थलांतरितांवर लक्ष ठेवण्यासाठी कळंगुटचे पोलीस निरीक्षक परेश नाईक म्हणाले. 'आम्ही घरमालकांना आणि भाडेकरूंना विनंती केली आहे की, त्यांनी पुढील 24 तासांच्या आत त्यांची भाडेकरू पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी.'

त्यात अयशस्वी झाल्यास विभागाकडून कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या मोहिमेत पोलिसांना जवळपास 300 भाडेकरूंनी ही प्रक्रिया केली नसल्याचे आढळून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com