Calangute Drug Case: अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एकाला अटक, कळंगुट पोलिसांची कारवाई

कळंगुट पोलिसांनी 90 हजारांचे अमली पदार्थ जप्त केले
Calangute Drug Case
Calangute Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Drug Case: गोव्यात वाढत्या शहरीकरणाबरोबरच गुन्हेगारीच्या घटनाही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. गौरावाडा येथे कळंगुट पोलिसांनी अंमली पदार्थांवर छापा टाकल्याचे वृत्त समोर आले असून यात एका संशयितास अटक करण्यात आली आहे.

Calangute Drug Case
Goa Ki Baat : 'मन की बात'च्या धर्तीवर आता राज्यात 'गोवा की बात'

याबाबत अधिक माहिती अशी की, कळंगुट येथील गौरावाडा येथे पिझा हटजवळ एका काळ्या रंगाच्या महिंद्रा जीपची झडती घेतली असता जीपमध्ये 09 ग्रॅम वजनाचे हेरॉईन हा अमली पदार्थ आढळून आला.

याची किंमत 90 हजार रुपये आहे. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी संशयित ऑस्टिन डिसोझा (39, उमतावाडा, कळंगुट) याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.

Calangute Drug Case
Self Accident in Goa : चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार रस्ता सोडून थेट....; केपेत भीषण अपघात

90 हजार रुपयांचे अमली पदार्थ तसेच जीप मिळून एकूण 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयिताला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

ही कारवाई पीआय दत्तगुरू सावंत यांच्या देखरेखीखाली पीएसआय रमेश हरिजन, हेड कॉन्स्टेबल विद्यानंद आमोणकर, मनोज नाईक, पोलिस कॉन्स्टेबल आकाश नाईक, विजय नाईक, गणपत तिलोजी, अमीर गरड, लक्ष्मण पाटेकर यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com