St. Xavier Controversy: वेलिंगकरांना अटक व्हावी म्हणून कलंगुटमध्ये शांतीत क्रांती; जमावाने दर्शवली सामाजिक एकता

Calangute March against Velingkar: कलंगुटमधील सेंट झेवियर्स यांच्या भाविकांनी एकत्र येत वेलिंगकरांच्या विरोधात शांततापूर्वक निषेध व्यक्त केला
Calangute March against Velingkar: कलंगुटमधील सेंट झेवियर्स यांच्या भाविकांनी एकत्र येत  वेलिंगकरांच्या विरोधात शांततापूर्वक निषेध व्यक्त केला
Calangute March Dainik Gomantak
Published on
Updated on

St. Xavier Controversy in Goa

म्हापसा: गेल्या अनेक दिवसांपासून गोव्यात सुभाष वेलिंगकरांनी सेंट झेवियर्स यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. समाजातील काही लोकांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या असून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सुभाष वेलिंगकर यांना अटक व्हावी अशी मागणी केली जातेय. यावरूनच राज्यात आंदोलनांना देखील जोर आलाय. या घडीला काही लोकं वेलिंगकरांच्या पक्षात उभी आहेत तर काहींना त्यांचे विधान पटलेले नाही.

कलंगुटमध्ये वेलिंगकरांचा निषेध

काल (दि. ८ ऑक्टोबर) रोजी कलंगुटमधील सेंट झेवियर्स यांच्या भाविकांनी एकत्र येत सुभाष वेलिंगकरांच्या विरोधात शांततापूर्वक निषेध व्यक्त केला. राज्यात पावसाचा कहर सुरु असताना देखील रस्त्यावर उतरत लोकांनी हातात मेणबत्या घेऊन वेलिंगकरांच्या वक्तव्याविरुद्ध संताप व्यक्त केला. कलंगुट चर्च पासून सुरु झालेला हा मोर्चा कलंगुट पोलीस स्टेशन पर्यंत सुमारे एक किलोमीटर चालला. या मोर्चात महिला, मुलं, नन्स देखील सामील होती.

Calangute March against Velingkar: कलंगुटमधील सेंट झेवियर्स यांच्या भाविकांनी एकत्र येत  वेलिंगकरांच्या विरोधात शांततापूर्वक निषेध व्यक्त केला
Subhash Velingkar: वेलिंगकर अटकेला 'का' घाबरले? धार्मिक तेढ रोखण्यात अपयशी 'सावंत सरकार' बरखास्त करण्याची मागणी

पोलिसांचा शोध सुरूच

पणजीत सत्र न्यायालयाने सुभाष वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता आणि त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तुकडी रवाना झाली होती. शुक्रवार (दि. ४ ऑक्टोबर) पासून पोलीस गोवा आणि महाराष्ट्रात वेलिंगकरांचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांकडून अनेक लोकांची चौकशी देखील केली जातेय मात्र अद्याप वेलिंगकरांचा पत्ता सापडला नाही. गोवा पोलिसांच्या या सर्च ऑपरेशनला यश मिळेल की नाही हे पाहावं लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com