कळंगुट शेतकऱ्यांचा पेट्रोलपंप बांधणीला विरोध; शेतीचे नुकसान होण्याची भीती

येत्या 24 तासांत अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करू नाहीतर वेळ पडलीच तर कोर्टातही जाऊ, असा सूर शेतकरीवर्गातून उमटत आहे.
Calangute Farmers
Calangute FarmersDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: एकीकडे सरकार आणि अनेक नेते शेतीला प्रोत्साहन देत असून लोकांना शेती करण्यास आणि त्यांच्या शेताचे संरक्षण करण्यास प्रवृत्त करत आहेत. पण, आज कळंगुटमधल्या शेतकऱ्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. शेतकरी एकामागून एक बांधकामाचे बळी ठरत आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी इतर बांधकामासाठी वापरात घेतल्या जात आहेत. जमिनी कायदेशीररित्या रूपांतरित झाल्या असल्या तरी काँक्रीटीकरणामुळे हळूहळू गावाचे आणि शेतीचे वैशिष्ट्यच नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कळंगुट (Calangute Constituency) येथील स्थानिकांसह अनेक शेतकरी (Calangute Farmers) शेताच्या जमिनीवर होणाऱ्या पेट्रोल पंपाबाबत विरोध करत आहेत. या विरोधात शेतकऱ्यांसह स्थानिकांनीही बाहेर येऊन आवाज उठवला आहे. जागेच्या मालकाने ती जागा पेट्रोल पंपाच्या बांधकामासाठी राष्ट्रीय पेट्रोलियम कंपनीला भाड्याने दिले आहे. (Calangute farmers oppose construction of petrol pump)

Calangute Farmers
गोवा फॉरवर्डचे उमेदवार संतोषकुमार सावंत पोलिसांच्या ताब्यात

गेल्या 24 तासांत, स्थानिकांनी सांगितले की, 500 हून अधिक ट्रकच्या फेऱ्या शेतात माती/वाळू टाकताना दिसल्या आहेत; आणि काम वेगाने सुरू आहे. कळंगुटचा विकास हवा, पण शेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास करून नाही, असेही काहींनी मत व्यक्त केले आहे. आज लोक आवाज उठवत आहेत, म्हणून कोणीही शेतात येऊ नये किंवा शेताच्या जवळ जाऊ नये म्हणून मालक आणि बांधकाम कंपनीने 24 तास ठिकाणी सुरक्षा ठेवली आहे.

या पेट्रोलपंपामुळे त्यांची शेते उद्ध्वस्त होण्याची त्यांना भीती आहे आणि ते शेती करू शकणार नाहीत. आधीच साथीच्या कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. इतर व्यवसाय आणि नोकऱ्या नाहीत. आणि त्यात स्वतःचे शेत धोक्यात आहे आणि त्यामुळे उपजीविकाही धोक्यात आहे, असे मत स्थानिक शेतकऱ्यांनी (Farmers) व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, स्थानिक नेत्यांसह अधिकारी हे सर्व यात गुंतलेले आहेत आणि पेट्रोल पंप शेतात बांधू देत आहेत. पंचायत एकतर्फी असून शेतातील अशा नासाडीचे समर्थन करत आहे. आणि ते स्थानिकांचा विशेषतः शेतकऱ्यांचा विचार करत नाहीत. पेट्रोलियमच्या टाक्या ज्या भूमिगत बांधल्या जातील त्याचा पिकांवर आणि शेताच्या सुपीकतेवर वाईट परिणाम होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास 30 हून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान होईल.

दरम्यान, या प्रकल्पाविरोधात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे कळंगुट मंचाचे सदस्य प्रेमानंद दुईकर यांनी सांगितले. ते म्हणाले, असे प्रकल्प पर्यावरणाचा ऱ्हास करणारे आहेत. आज जनतेला शेती आणि शेताचे महत्त्व कळले आहे पण आपण काय करतोय, काँक्रीटच्या जंगलात आयुष्य घालवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आम्ही येत्या 24 तासांत अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करू नाहीतर वेळ पडलीच तर कोर्टातही जाऊ.

या सर्व प्रकारामुळे स्थानिक शेतकाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. यावर भविष्यात काय घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com