Calangute Beach: गोव्यात किनाऱ्यांवर प्रचंड गर्दी! पर्यटकांची 'कळंगुट'ला पसंती; सर्व हॉटेल्स फुल्ल

Goa Tourism: बार्देश तालुक्यातील समुद्र किनारे देशी विदेशी पर्यटकांनी फुलून गेले आहेत. कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर तर सध्या पर्यटकराजच दिसत आहे.
Calangute Beach Tourists
Goa Tourism NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism News

बार्देश: बार्देश तालुक्यातील समुद्र किनारे देशी विदेशी पर्यटकांनी फुलून गेले आहेत. कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर तर सध्या पर्यटकराजच दिसत आहे. विदेशी पर्यटक कमी असले तरी देशी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. नववर्षांपर्यंत ही संख्या लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे.

कुटुंबीयांसमवेत आलेल्या अनेक पर्यटकांनी किनारपट्टीतील हॉटेल्समध्ये आसरा घेतला आहे. कळंगुट, बागा, हणजूण, कांदोळी भागात हजारो पर्यटक उतरलेले आहेत. बहुतेक हॉटेल्सच्या खोल्या बुक झाल्या असून सर्व हॉटेल्स फुल्ल होण्याची शक्यता आहे. किनारी भागात हॉटेल्सच्या खोल्यांचा दर जास्त असल्याने काही पर्यटक नजीकच्या शहरातील हॉटेल्सकडे वळले आहेत.

काणकोणातील किनाऱ्यावर गर्दी

येथील किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत. पाळोळे समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील पालिकेचा वाहनतळ अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे किनाऱ्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर खासगी जागेत वाहने पार्क करण्यात येत आहेत. नाताळ व नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी वाढल्याने पर्यटन व्यावसायिक सुखावले आहेत. मात्र यंदा परदेशी पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

Calangute Beach Tourists
Goa Tourism: 'सनबर्न'मुळे खरोखर पर्यटक वाढतात का? सरकारच्या पर्यटनवृद्धीच्या धोरणाबाबत अनेक प्रश्न

संगीतावर थिरकणार हजारो पर्यटक

राज्यात नाताळबरोबरच नववर्षाच्या स्वागताचा उत्साहात असल्याने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. पुढील पाच दिवसांत हा जल्लोष आणखी भर पडणार आहे. पुढील पाच दिवस किनारी भागात संगीत रजनींचेही मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे, त्यावर हजारो पर्यटक थिरकणार आहे. आयोजकांनी संगीत रजन्यांची जय्यत तयारी चालवली आहे.

Calangute Beach Tourists
Goa Tourism: गोव्यात किनारे, हॉटेल्स हाऊसफुल्ल! पर्यटकांच्या संख्येत अधिक वाढ होण्याची शक्यता

पर्यटकांचे देवदर्शन

अनेक पर्यटक सकाळच्या वेळी गोव्यातील देवदर्शन व अन्य पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. त्यामुळे प्रमुख चर्च, मंदिरात पर्यटकांची गर्दी दिसत आहे. तसेच गोव्यात येणारे बहुतेक पर्यटक अधिकतर वेळ समुद्र किनाऱ्यावर घालवत असल्यामुळे किनाऱ्यांवर प्रचंड गर्दी दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com