

पणजी : गोव्यातील कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर एका पर्यटकावर झालेल्या हल्ल्याची गंभीर घटना मंगळवारी घडली. बंगळुरू येथील ४२ वर्षीय कौशत पाशा असे जखमी पर्यटकाचे नाव असून, शॅक कर्मचाऱ्यांकडून त्याच्यावर कथित मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रकिनाऱ्यावरील एका शॅकमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला. हा किरकोळ वाद काही वेळातच उग्र रूप धारण करत झटापटीत परिवर्तित झाला. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, १५ ते २० जणांच्या गटाने कौशत पाशा यांच्यावर लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने हल्ला केला.
या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी तत्काळ मदत करून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे. संबंधित शॅक कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयितांचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे पर्यटन क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.