पणजी : गोव्यात कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. मगोपच्या सुदिन ढवळीकर यांच्यासह थिवीचे भाजप आमदार नीळकंठ हळर्णकर आणि सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी राज्यपालांकडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. राजभवनातील नव्यानेच बांधलेल्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी समारंभ झाला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच खातेवाटप करण्याची शक्यता मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी व्यक्त केली आहे. त्याप्रमाणे उद्या (रविवारी) खातेवाटप केलं जाईल. यापूर्वी रोहन खंवटे यांना मंत्रिमंडळात घेतल्याने हळर्णकर हे बार्देशचे दुसरे भाजप नेते आहेत. सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांना मंत्रिमंडळात घेतल्याने फोंडा तालुक्यात चार मंत्री होणार असले, तरी मगोपच्या प्रस्तावानुसार ढवळीकर यांना मंत्रिपद देण्यात येत आहे. आगामी पंचायत आणि लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून ढवळीकरांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याची माहिती आहे.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Reginald Lawrence) यांचे नाव सुरुवातीपासूनच सर्वाधिक चर्चेत होते. मात्र, स्थानिक आणि केंद्रीय भाजप नेत्यांच्या सूचनेनुसार त्यांना मंत्रिपदाऐवजी महामंडळ देण्याचे ठरल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याऐवजी सुभाष फळदेसाई यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. रेजिनाल्ड यांना यापूर्वी उपसभापतीपदाच्या शर्यतीतूनही बाहेर पडावं लागलं होतं. आता मंत्रिपदाबाबतही त्यांना डावलण्यात आल्याने रेजिनाल्ड नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.