Fatorda Development: फातोर्ड्याचा विकास घेतला साधून

Fatorda Development: विजय सरदेसाई : नथीतून मारला तीर; सरकारी कार्यक्रमांचा उठवला लाभ
Fatorda Development
Fatorda DevelopmentDainik Gomantak
Published on
Updated on

Fatorda Development: आपल्‍या मतदारसंघाचा विकास हे प्रत्येक आमदाराचे कर्तव्य व जबाबदारी आहे. गेल्या दहा वर्षांत फातोर्डा मतदारसंघाचा झपाट्याने विकास झाला आहे. त्‍यासाठी केंद्र व राज्‍य सरकारच्‍या कार्यक्रमांचा अचूक फायदा घेतला. मी विरोधी पक्षाचा असलो तरी लढवय्या असल्यामुळेच ही कामे होऊ शकली, असे प्रतिपादन आमदार विजय सरदेसाई यांनी केले.

Fatorda Development
Goa National Games 2023: राज्यावर नव्या करांची शक्यता; राज्य आर्थिक संकटात

दवंडे येथील जुनी पाईपलाईन बदलून नवीन मोठ्या आकाराची पाईपलाईन घालण्याच्या कामाचा शुभारंभ केल्‍यानंतर सरदेसाई बोलत होते. यावेळी नगरसेवक लिंडन परेरा, इतर नगरसेवक व ग्रामस्‍थ उपस्‍थित होते.

सरदेसाई म्‍हणाले की, रस्ते, पाणी, वीजपुरवठा, गटारे, सिवरेज पाईपलाईन आदी साधनसुविधांमध्ये आमूलाग्र बदल केला. राष्‍ट्रीय स्पर्धेच्या उद्‌घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्याने फातोर्ड्यातील रस्ते गुळगुळीत करून घेतले. मागे जी-२०च्या परिषदा झाल्या. त्यापूर्वी ब्रिक्ससारख्या आंतरराष्ट्रीय परिषदा, लुसोफोनिया स्पर्धा झाल्या. या सर्वांचा आपण अचूक फायदा फातोर्डा मतदारसंघाच्‍या विकासासाठी करून घेतला.

Fatorda Development
Goa Government: राष्ट्रीय स्पर्धेमुळे 600 ते 700 कोटींचा भुर्दंड; राज्य आर्थिक संकटात

एका वर्षानंतर रस्ते मधोमध फोडण्यास बंदी घातली जाणार आहे. तोपर्यंत आपण फातोर्डा मतदारसंघात रस्‍त्‍यांच्‍या दोन्ही बाजूला वीजवाहिन्‍या टाकून घेणार आहे. काही ठिकाणी हे काम पूर्ण झालेले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाण्याची जलवाहिन्‍या घातली तर कुणालाही ही जोडणी घेण्यासाठी रस्ता मधोमध फोडण्याची गरज भासणार नाही, असे सरदेसाई यांनी सांगितले. सध्‍या मडगाव नगरपालिकेच्‍या प्रभाग तीनमधील दवंडे वाड्यावरुन २० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पाईपलाईन घालण्यास प्रारंभ करण्‍यात येत आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असेही ते म्‍हणाले.

600 कोटी गेले कुठे? आणखी 250 कोटी कशासाठी?

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खेळांवर, विकासकामांवर आतापर्यंत ६०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र एवढा खर्च झाल्‍याचे दिसत नाही. तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे आणखी २५० कोटींची मागणी केली आहे. या सरकारने ज्या-ज्या साधनसुविधा वाढविण्यास सुरूवात केली आहे, त्यातील अर्ध्या अधिक अपूर्णावस्थेत आहेत. काही प्रकल्प तर सुरूच झालेले नाहीत. ज्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांनी सरकारला बहुमत मिळवून दिले. पण त्याचबरोबर त्यांनी विधिमंडळ लोकशाही संकल्पनाच नष्ट केली, असा आरोपही त्‍यांनी केला.

फातोर्डा मतदारसंघाचा विकास झपाट्याने होत आहे. त्‍यामानाने मडगाव मतदारसंघाचा विकास होत नाहीय. या मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. म्‍हणूनच मडगावातील लोक आता फातोर्ड्यात स्‍थलांतर करू लागले आहेत.

- विजय सरदेसाई, फातोर्ड्याचे आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com