आगोंद येथील बस स्टॉप लपले झाडीत

पंचायत मंडळाचे दुर्लक्ष; दुरुस्ती करण्याची मागणी
Bus stop
Bus stop Dainik Gomantak

आगोंद: आगोंद पंचायत क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर असलेल्या बस‌स्थांब्याची पार दुर्दशा झाली आहे. गेल्या 30 वर्षांत त्यांची दुरुस्ती झालेली नाही. या घडीला काही बसथांबे झाडीत लपलेले आहेत तर काही मोडकळीस आलेले आहेत. (Bus stops hidden in bushes in goa)

Bus stop
कृषिमंत्री रवी नाईक यांच्या 'त्या' वक्तव्याबद्दल भाजपच्याच गोटात चर्चा सुरू

त्यामुळे बऱ्याच बसथांब्यांकडे प्रवासी ढुंकूनही पाहत नाहीत. पंचायत मंडळाने तातडीने पावसाळ्यापूर्वी या बसथांब्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

मुख्य रस्त्या‌‌च्या कडेला एकूण सात बसथांबे असून, 35 वर्षांपूर्वी स्थानिक पंचायतीकडून प्रवाशांच्या सोयीसाठी हे बसथांबे उभारण्यात आले होते, असे माजी सरपंच शाबा नाईक गावकर यांनी सांगितले. सध्या यातील बरेचसे बसथांबे मोडकळीस आले आहेत. काहींचे पत्रे उडाले आहेत, काही झाडाझुडपांनी वेढलेले आहेत. या बसथांब्यावर थांबणे प्रवाशांना धोक्‍याचे बनले आहे. पंचायत मंडळाच्या दुर्लक्षामुळे येथील बसस्थानकांची दुर्दशा झाली असून, हे बसथांबे वापरण्यास योग्य बनवावे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com