Bicholim News: डिचोलीत बसस्थानक कचऱ्याच्या विळख्यात

Bicholim News: स्वच्छतेबाबत आघाडीवर असलेल्या डिचोली शहरात कचऱ्याची समस्या कायम आहे.
Bicholim News
Bicholim NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News: स्वच्छतेबाबत आघाडीवर असलेल्या डिचोली शहरात कचऱ्याची समस्या कायम आहे. शहरातील स्वच्छतेवर पालिका अधिकाधिक भर देत असली, तरी कचरा काही केल्या पालिकेची पाठ सोडत नाही, असेच दिसते. निर्जन स्थळासह काही ठरावीक जागांवर कचरा टाकण्याचे प्रकार चालूच आहेत.

Bicholim News
Breast Cancer: भीषण वास्तव! गोव्यात 1 लाखात 55 महिलांना स्‍तनाचा कर्करोग...

त्यामुळे डिचोलीवासीय संतापले असून सध्या शहरातील बसस्थानक परिसरात बगलमार्गालगत कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. बगलमार्गाला टेकून प्लास्टिकसह मोठ्या प्रमाणात कचरा साचला अाहे.

या कचऱ्यात घाणयुक्त ‘सॅनिटरी पॅड्‌स’ही टाकण्यात येत आहेत. त्यामुळे बगलमार्गावर कचऱ्याचे ओंगळवाणे चित्र दिसत असून, सध्या दुर्गंधी पसरली आहे. डासांची पैदास वाढून रोगराईची भीती आहे. आधीच शहरात ‘डेंग्यू’ने धुमाकूळ घातला आहे.

हा कचरा नेमका कोठून आणि कसा येतोय, त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असले, तरी बगलमार्गाने ये-जा करणारे हा कचरा टाकतात. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. बगलमार्गावर ज्याठिकाणी कचरा साचला आहे. बगलमार्गालगतच नदीचा फाटा वाहत आहे.

आधीच शहरातून वाहणारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. बगलमार्गावरील साचणाऱ्या कचऱ्यामुळे नदीवरील संकट वाढण्याची भीती आहे. बगलमार्गाच्या बाजूने कचरा टाकण्याचा प्रकार वेळीच बंद झाला नाही, तर नदीवर मोठा आघात होण्याचे संकेत आहेत.

Bicholim News
Subhash Shirodkar: नियमित अनुदान हा शेतकऱ्यांचा हक्कच; जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

दरम्यान, या कचऱ्यासंदर्भात पालिकेशी संपर्क साधला असता, हा प्रकार बंद करण्यासाठी पावले उचलणार असल्याचे सांगण्यात आले.

सॅनिटरी पॅड्‌स रस्त्यावर

शहरातील नवीन पुलालगत बसस्थानकाच्या विरुद्ध बाजूने बगलमार्गाच्या बाजूने सध्या प्रचंड प्रमाणात कचरा साचल्याचे दिसून येत आहे. या कचऱ्यात प्लास्टिकसह ओला कचराही आढळून येत आहे.

चिंताजनक बाब म्हणजे या कचऱ्यात वापरलेली घाणयुक्त सॅनिटरी पॅड टाकण्यात येतात. कचरा कुजल्याने बगलमार्गावर दुर्गंधी पसरली आहे. बऱ्याचदा भटकी कुत्री कचऱ्यातील खाद्यपदार्थांवर तुटून पडल्याचे दिसून येते. घाणयुक्त ‘सॅनिटरी पॅड्‌स’ ओढून रस्त्यावर आणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com