Mapusa News : उपजीविकेसाठी पती-पत्नीची जोडीने बससेवा; दाम्पत्य बनले आदर्श

Mapusa News : आसगाव-बादे-म्हापसा मार्गावर धावते बस
Mapusa  bus
Mapusa busDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa News : म्हापसा कोणतेही काम कमी दर्जाचे नसते. काम हे केवळ काम असते व त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीच नसते.

आणि हाच ध्यास उराशी बागळून झरवाडो, शापोरा येथील चंदन (४०) व कविता (३१) बेतकर हे पती-पत्नी मागील पाच वर्षांपासून आसगाव-बादे-म्हापसा मार्गावर त्यांची स्वतःची बससेवा चालवत आहेत.

कविता ही कंडक्टर , तर चंदन हा चालक आहे. चंदनचे शिक्षण हे नववीपर्यंत, तर कविता हिचे शिक्षण मॅट्रीक. शिक्षणात झेप नसली तरी, जीवनात उत्तुंग भरारी घेऊन हे जोडपे इतरांसाठी आदर्श बनले आहे.

२००८मध्ये चंदन व कविता यांचे लग्न झाले. त्यांना समीक्षा, देवेश व अश्वी अशी तीन मुले आहेत. कविता सांगते की, महिलेने कोणतेही काम करताना संकोच करू नये. बससेवा ही पुरुषप्रधान क्षेत्र म्हणून ओळखले जाते, मात्र या सेवेत असल्याचा तिला अभिमान वाटतो.

कविता म्हणाली, माझे सासरे हे कदंबा महामंडळात होते, तेव्हापासून पती चंदनला बस चालविण्याची ओढ. त्याने सुरवातीला कदंबमध्ये नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु यात यश आले नाही.

२०१९मध्ये आम्ही कर्जातून बस सेकंड हॅण्ड खरेदी केली. एप्रिलमध्ये आसगाव-बादे-म्हापसा या मार्गावर बससेवा सुरू केली. मात्र, जूनमध्ये चंदनचा अपघात झाल्याने तो दोन महिने घरीच राहिला. तेव्हा आमचा मित्र सुमित जोशी व वाहक रितेश गडेकर यांची मदत झाली. त्यांनी आमची बस सांभाळली. कोविड काळात अडीच वर्षे बस बंद राहिली. खूप आर्थिक त्रास सहन करावा लागला, बचतही संपली.

Mapusa  bus
Goa Tourism: आवर्जून पहावा असा निसर्ग संपन्नतेने साकारलेला समुद्रापलीकडचा गोवा

दररोज सकाळी ६.३०वाजता आम्ही घरातून बाहेर पडतो व रात्री उशिरा ८.३०वाजता घरी पोहचतो. दिवसाला १२ बसट्रीप आम्ही मारतो. या कामामुळे घरी मुलांना पुरेसा वेळ देणे जमत नाही. याची खंत आहेच, मात्र घरी सासू (संजीवनी तुळशीदास बेतकर) मुलांचे जेवण व त्यांचे संगोपन करते. याशिवाय, सासू व माझी आई गोदावरी सुरेश वाघदरे या दोघांनी मला व चंदनला या बसव्यवसायात उतरण्यासाठी प्रोत्साहन दिले.

- कविता बेतकर, वाहक

प्रवाशांना उद्धटपणाने वागणे आम्हाला जमतच नाही. याशिवाय नाते व माणुसकी जपणे हा माझा व कविताचा मुख्य उद्देश आहे. माझी स्वतःची बस सुरू करण्यापूर्वी मी दहा वर्षे ड्रायव्हर म्हणूनच काम केले. त्यापूर्वी मिळेल ती रोजंदारीची कामे करायचो. ज्या बसवर मी दहा वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले, त्याच बस मालकाकडून ही बस खरेदी केली. मागील पाच वर्षांपासून मी स्वतःची बससेवा लोकांना अविरतपणे करत आहे.

- चंदन बेतकर, चालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com