Bicholim News: डिचोली बसस्थानकाजवळ विभाजक उभारा; बसचालक-प्रवाशांची मागणी

वाहतूक पोलिसाचीही गरज
Bicholim Bus Stand issue
Bicholim Bus Stand issueDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim bus Stand Issue: डिचोली बसस्थानकाजवळील रस्त्यावर पुन्हा विभाजक बसवतानाच, कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नेमावा, अशी मागणी बसचालक आणि प्रवाशांनी केली आहे.

शहरातील पूर्वीचे बसस्थानक मोडून त्या ठिकाणी नवीन बसस्थानक बांधण्यात येत आहे. त्यामुळे पूर्वीच्याच स्थानकाच्या एका कोपऱ्यात बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला टेकूनच तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे.

Bicholim Bus Stand issue
Pepper Spray Case: पेपर स्प्रे प्रकरणात शिक्षण खात्याकडून हात वर

तात्पुरते बसस्थानक रस्त्याला लागूनच असल्याने, विविध भागातून येणाऱ्या प्रवासी बसगाड्या आत-बाहेर करताना बसचालकांना अक्षरशः कसरत करावी लागते.

बऱ्याचवेळी गोंधळही निर्माण होत असतो. या प्रकारावर नियंत्रण येण्यासाठी बसस्थानकाला टेकूनच बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध विभाजक म्हणून काँक्रीटचे ब्लॉक बसविण्यात आले होते. हे काँक्रीटचे ब्लॉक सध्या गायब झाले आहेत.

Bicholim Bus Stand issue
Viral Video: मद्यधुंद युवतीचा धिंगाणा; पणजीत रस्ता रोखला

काँक्रीटच्या ब्लॉक्सची मोडतोड

अज्ञात वाहनांची धडक बसून रस्त्याच्या मधोमध बसविण्यात आलेल्या काँक्रीटच्या ब्लॉकांची मोडतोड झाली होती, अशी माहिती बसस्थानकावरील काही पायलटांकडून मिळाली आहे.

मोडलेले हे ब्लॉक रस्त्यावर अस्ताव्यस्त पडून वाहतुकीस धोका निर्माण झाला होता. हा धोका ओळखून पालिकेने ब्लॉकच काढून टाकण्यात आले, अशीही माहिती मिळाली आहे.

"बसस्थानकाजवळील रस्ता दिवसेंदिवस वाहतुकीस असुरक्षित बनत आहे. बेशिस्त पार्किंगचे प्रकारही वाढले आहेत. सुरक्षित वाहतुकीसाठी विभाजक उभारणे आवश्यक आहे. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नेमावा."

- रघुनाथ परब, प्रवासी नागरिक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com