Cuchelim: गवताला लावलेल्या आगीत बस जळून भस्मभात! कुचेली येथील दुर्दैवी घटना

Cuchelim Bus Fire Incident: घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी पाण्याचा फवारा मारून आग नियंत्रणात आणली. तोपर्यंत संपूर्ण बस आगीत खाक झाली होती.
Cuchelim Bus Fire Incident
Cuchelim Bus Fire NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Cuchelim Bus Fire News

म्हापसा: कुचेली येथे साईबाबा मंदिराजवळ गवताला लावलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी प्रवासी बस पडली. यात बसमालकाचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे.ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. दुर्घटनाग्रस्त जीए ०१ यू ५२१० क्रमांकाची अंबा ट्रॅव्हल्स ही बस म्हापसा-पणजी मार्गावर सेवा देत असे.

बस मालक नितीन मांद्रेकर ( पर्वरी) यांनी या बसचे कोलवाळ येथील एका गॅरेजमध्ये नूतनीकरणाचे काम केले होते. नविन कुशल शीट कव्हर आणि इतर लहानसहान डागडुजीच्या कामाचा त्यात समावेश होता.

गॅरेजमधून काढून ही बस साईबाबा मंदिराच्या समोरील पठारावर पार्क केली होती. या पठारावरील सुकलेल्या गवताला लागलेली आग बसपर्यंत पोचली आणि काहीक्षणात बसने पेट घेतला.

Cuchelim Bus Fire Incident
Ponda Fire News: तिस्क-फोंडा येथे आगीचे थैमान! चष्म्याच्या दुकानाचे मोठे नुकसान

प्रसंगावधाने इतरांनी या ठिकाणीच पार्क केलेली अन्य वाहने सुरक्षित स्थळी हलवली. मात्र बसचा चालक घटनास्थळी नसल्याने ती आगीच्या झळापासून सुरक्षितस्थळी हलविणे शक्य झाले नाही.

काहीवेळात आगीने संपूर्ण बसला वेडा घातला. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी पाण्याचा फवारा मारून आग नियंत्रणात आणली. तोपर्यंत संपूर्ण बस आगीत खाक झाली होती.

Cuchelim Bus Fire Incident
Mapusa Goa: Music बंद करायला सांगितले म्हणून अश्लील शिवीगाळ, म्हापशात पर्यटकाला महिलांनी दिला बेदम चोप

म्हापसा अग्निशमन दलाचे हवालदार रणजित गावकर, जयेश कांदोळकर, अशोक वळवईकर, अक्षय सावंत व भगवान पाळणी या जवानांनीआगीवर नियंत्रण मिळवले. म्हापसा पोलिस हवालदार सुदेश नाईक यांनी पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com