Arpora Sarpanch
Arpora SarpanchDainik Gomatnak

Arpora Sarpanch: बर्च क्लब अग्नितांडवप्रकरणी नवीन अपडेट! भूमिगत माजी सरपंच न्यायालयासमोर हजर; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न

Goa Nightclub Fire: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बुधवारी रेडकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे रेडकर याचा पाय आणखी खोलात गेला होता.
Published on

म्हापसा: बर्च क्लब अग्नितांडवप्रकरणी भूमिगत झालेला हडफडेचा माजी सरपंच रोशन रेडकर जामीन फेटाळल्यानंतर २२ दिवसांनी (२२ जानेवारी) म्हापसा जेएमएफसी न्यायालयासमोर शरण आला. न्यायालयाने रेडकर याचा अधिकृत ताबा हणजूण पोलिसांकडे दिला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बुधवारी रेडकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे रेडकर याचा पाय आणखी खोलात गेला होता. त्यामुळे गुरुवारी सकाळी रेडकर आपल्या वकिलांसोबत म्हापसा जेएमएफसी न्यायालयासमोर शरण आला. दुपारी न्यायालयाने रेडकरचा ताबा हणजूण पोलिसांकडे दिला.

Arpora Sarpanch
Arpora Sarpanch : 'हा 25 निष्पाप लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला गंभीर गुन्हा', हडफडे सरपंचांच्या जामीन अर्जावर निकाल राखीव

६ डिसेंबर रोजी हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’मध्ये भीषण आग लागली होती. त्यात २५ निष्पाप लोकांचे जीव गेले होते. या प्रकरणात हणजूण पोलिसांकडून रेडकर याच्या रूपाने ही अकरावी अटक आहे. सुरुवातीला रेडकरने म्हापसा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज ३० डिसेंबर रोजी फेटाळला. त्यानंतर रेडकर उच्च न्यायालयात गेला. तेथेही रेडकरला दिलासा मिळाला नाही.

Arpora Sarpanch
Arpora Nightclub Fire: ‘बर्च’ नाईटक्लब नियमबाह्यच! हडफडे पंचायतीला जाग; मिठागरावर बांधकाम उभारल्याचे मान्य

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न

बर्च अग्नितांडव प्रकरणातील मुख्य संशयित लुथरा बंधूंना पोलिसांनी थायलंडहून काही दिवसांतच ताब्यात घेतले होते. मात्र, स्थानिक हडफडे गावचा सरपंच रोशन रेडकर याला इतके दिवस पोलिस कसे काय पकडू शकले नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com