राज्यात धिरयोला मान्यता नाहीच

रेजिनाल्ड यांच्या मागणीवर नीळकंठ हळर्णकर यांनी दिले उत्तर
Dhiryo
DhiryoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बैल किंवा रेड्याच्या झुंजी अर्थात धिरयोला राज्यात सरकारी मान्यता देण्यात सरकारचा कोणताही विचार नाही, असे लेखी उत्तर पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी आमदार आलेक्सो रेजिनाल्ड यांनी केलेल्या मागणीला लेखी उत्तर दिले आहे. राज्यात ज्या ठिकाणी धिरयो झालेले आहेत, त्याविरोधात बिगर सरकारी संस्थांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. माजी आमदार (स्व.) विष्णू वाघ यांनी आमदार असताना 2016 मध्ये धिरयो हा खेळ कायदेशीर करावा, अशी भूमिका मांडली होती. (bull fight is not recognized in the state of Goa )

Dhiryo
सत्तरीला वादळाचा दणका; तब्‍बल 20 वीजखांब आडवे

वाघ यांनी जी भूमिका मांडली होती, तीच भूमिका आम आदमी पक्षाचे व्हेन्झी व्हिएगस यांनी केली होती. त्याशिवाय पेडण्याचे आमदार जीत आरोलकर यांनीही धिरयोला पाठिंबा दिला होता. त्याशिवाय त्या हा खेळ अधिकृत केल्यास राज्याच्या महसुलातही वाढ होऊ शकते असे त्या दोन्ही आमदारांचे म्हणणे होते. मात्र प्राण्यांची होत असलेले शोषन पाहता तो बंद करणे आवश्यक असल्याचे प्राणी प्रेमींनी भुमिका मांडली होती.

Dhiryo
मुरगाव पालिकेची ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ ला सूचना

धिरयोला न्यायालयाने घातली बंदी

कायदेशीर झाल्यास ते पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सरकारसाठी उत्पन्नाचा एक चांगला स्रोत ठरेल, असेही त्यावेळी वाघ यांना वाटत होते. 1997 च्या या वर्षात पिपल्स फॉर ॲनिमल या बिगरसरकारी संस्थेने धिरयोविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोव्यात धिरयोवर बंदी घालण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com