धावेत बीएसएनएल कंपनीची सेवा ठप्प

सत्तरी तालुक्यात धावे गावातील बीएसएनएल कंपनीची मोबाईल रेंज नसल्याने लोकांना संपर्क करणे कठीण बनले आहे. त्यामुळे लोकांचे हाल झाले आहेत.
BSNL
BSNLDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई : सत्तरी तालुक्यात धावे गावातील बीएसएनएल कंपनीची मोबाईल रेंज नसल्याने लोकांना संपर्क करणे कठीण बनले आहे. त्यामुळे लोकांचे हाल झाले आहेत.

BSNL
वेर्णात अज्ञाताचा मृतदेह सापडला

बीएसएनएल कंपनीची सेवा आठ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्याकडे कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. आठ दिवसांपासून रेंज नसल्याने संपर्क साधणे कठीण झाले आहे. नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे गावात तार बाग रस्त्यावर मोबाईल मनोरा आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. वाळपई बीएसएनएल कार्यालयात जाऊन विचारणा केल्यावर मनोऱ्यातील यंत्रणेत बिघाड झाला असून, ती यंत्रणा आणावी लागेल, असे सांगण्यात येते. परंतु ही गोष्ट माहीत असूनही कंपनीचे अधिकारी यंत्रणा दुरुस्तीसाठी अजूनही पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे सेवा ठप्प आहे. मनोरा दुरुस्तीसाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
ED Raids Goa Delhi Karnal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com