Panjim: पणजीत केरळच्या भावांमध्ये तुंबळ हाणामारी, मद्यधुंद अवस्थेत केले एकमेकांना रक्तबंबाळ
FightingFreePik

Panjim News: पणजीत भररस्त्यात भावांमध्ये फ्रीस्टाईल; रक्तबंबाळ होईपर्यंत चोपलं

Panaji News: हिंदू फार्मसीजवळ असणाऱ्या गार्सिया दे ओर्टा उद्यानात दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
Published on

पणजी: गोवा म्हटलं की मौजमजा, मस्ती, स्वस्त मिळणारी दारू आणि पार्टी अशी धारणा करुन पर्यटक गोव्यात येतात. त्यात काही गैर नसले तरी येथे आल्यावर नियमांना धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने वागणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील काही कमी नाही.

पणजीतील हिंदू फार्मसीच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या उद्यानात केरळच्या रहिवासी असणाऱ्या दोन भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. दोघांना एकमेकांना रक्तबंबाळ होईपर्यंत जखमी केले.

झाले असे की मंगळवारी पणजीतील हिंदू फार्मसीजवळ असणाऱ्या गार्सिया दे ओर्टा उद्यानात दोघांमध्ये तुंबळ हाणामारी सुरु होती. हा प्रकार स्थानिकांच्या नजरेस पडल्यानंतर त्यांनी पणजी पोलिसांनी घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांमध्ये सुरु असलेली मारामारी बंद केली. पण, यातील एकजण गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी त्याला बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासाअंती दोघेही भाऊ असल्याचे समोर आले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या या स्थानिकांनी या भांडणात आणखी एका तिसऱ्या व्यक्तीचा समावेश होता असे सांगितले. सुरुवातीला तिघेही भांडत होते असे स्थानिक म्हणाले.

Panjim: पणजीत केरळच्या भावांमध्ये तुंबळ हाणामारी, मद्यधुंद अवस्थेत केले एकमेकांना रक्तबंबाळ
Candolim Health Center: कांदोळी केंद्राला सामुदायिक दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील; आरोग्यमंत्री राणेंचे आश्वासन

भांडणात एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड मारुन त्याला जखमी केले. एक पर्यटक झोपेत असताना दुसऱ्याने येऊन दगड मारल्याचे त्याने सांगितले. यामुळे पर्यटकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला होता. स्थानिकांनी याबाबत त्याला विचारणा केली.

मारामारीत त्याचा मृत्यू झाला असता तर ? तुम्ही येथे फक्त दारु पिण्यासाठी येता का? असे प्रश्न स्थानिकांनी पर्यटकांना विचारले. दरम्यान, याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही तसेच कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. जखमी एका पर्यटकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मद्यधुंद अवस्थेत असणारे पर्यटक त्यांना हवे तसे वागून गोव्याची इमेज खराब करतात असे मत एका स्थानिकाने व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com