''हे तर दुबई-लंडनमध्येही नाही!' गोव्यातील 'डिजिटल ट्रायल रूम' पाहून ब्रिटिश थक्क; Watch Video

Goa Digital Trial Room: गोव्यातील एका स्टोअरमधील अत्याधुनिक 'ट्रायल रूम'चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे
''हे तर दुबई-लंडनमध्येही नाही!' गोव्यातील 'डिजिटल ट्रायल रूम' पाहून ब्रिटिश थक्क; Watch Video
Published on
Updated on

Futuristic trial rooms Goa: गोव्यातील एका स्टोअरमधील अत्याधुनिक 'ट्रायल रूम'चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ब्रिटिश दाम्पत्याने या ट्रायल रूमचे कौतुक करत, अशी सुविधा दुबई, लंडन किंवा न्यूयॉर्कमध्येही पाहिली नसल्याचं म्हटलंय. या व्हिडीओमुळे भारताच्या तांत्रिक प्रगतीची जगभरात चर्चा सुरू झालीये.

गोव्यातील 'फ्युचरिस्टिक' ट्रायल रूम पाहून ब्रिटिश दाम्पत्य थक्क

'ट्रॅव्हल विथ द क्रॉस' नावाचे यूट्यूब चॅनल चालवणारे लियाम आणि डॅनी क्रॉस या ब्रिटिश दाम्पत्याने त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. दक्षिण गोव्यातील 'अझोर्ते' नावाच्या स्टोअरमध्ये त्यांना हा अनोखा अनुभव आला. व्हिडिओमध्ये डॅनी म्हणते, "हे पहा, ही ट्रायल रूम किती भविष्यवेधी आहे!" तिचा नवरा लियाम ट्रायल रूममध्ये शिरताच, त्याच्यामागे असलेल्या स्क्रीनवर त्याने निवडलेले तीन कपड्याचे आयटम्स त्यांच्या साईजसह आपोआप दिसू लागले.

''हे तर दुबई-लंडनमध्येही नाही!' गोव्यातील 'डिजिटल ट्रायल रूम' पाहून ब्रिटिश थक्क; Watch Video
Goa Assembly: घरे नियमनाचे पहिले पाऊल! सरकारी जमिनींवरील 400 चौ.मी. जागेतील बांधकामे होणार नियमित, विधेयक सादर

"आरसा कपड्यांचे आयटम्स आणि त्यांची साईज ओळखतो. आणि समजा तुम्हाला दुसरी साईज हवी असेल, तर तुम्ही स्क्रीनवर निवडू शकता आणि कर्मचारी ती साईज तुम्हाला लगेच आणून देतील," असं डॅनीने व्हिडिओमध्ये समजावलं. एवढंच नाही तर, स्क्रीनवर त्या कपड्यांसोबत जुळणारे इतर आयटम्सही दिसतात आणि ते ट्राय करण्यासाठी कर्मचाऱ्याला बोलावण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. डॅनीने स्टोअरचं कौतुक करत म्हटलं, "हे किती मस्त आहे!"

'थर्ड वर्ल्ड' म्हणणाऱ्यांना भारताचे सडेतोड उत्तर!

या दाम्पत्याने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, "हे दुबईत नाही, हे लंडनमध्ये नाही, हे न्यूयॉर्कमध्ये नाही. हे भारतात आहे. मला माफ करा, पण भारत?! 'थर्ड वर्ल्ड' कोण म्हणतं रे बाबा?! हे तर वेल्समधील शॉपिंगपेक्षाही भारी आहे!! जिथे सेल्समन तुमच्या साईजसाठी 'मागे जातो' आणि स्पष्टपणे दिसतं की तो रूममधून बाहेर पडून एक मिनिट टिक-टॉकवर स्क्रोल करतो आणि मग रिकाम्या हाताने परत येतो. शॉपिंग अनुभवासाठी भारताला दाद द्यावीच लागेल."

व्हिडिओ व्हायरल, भारताच्या सकारात्मक प्रतिमेचे कौतुक

हा व्हिडिओ शेअर केल्यापासून त्याला १३,००० पेक्षा जास्त लाईक्स आणि जवळपास ५ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट्स सेक्शनमध्ये अनेक युझर्सनी भारताची सकारात्मक बाजू दाखवल्याबद्दल या दाम्पत्याचे कौतुक केलंय.

एका युझरने लिहिलं, "भारताची सकारात्मक बाजू दाखवणारं कुणीतरी पाहून आनंद झाला." दुसऱ्याने कमेंट केली, "स्लम्स आणि गरिबी दाखवणाऱ्या इतर वेस्टर्न प्रवाशांपेक्षा भारताची कूल बाजू दाखवल्याबद्दल धन्यवाद!" "हे अद्भुत आहे! प्रत्येक ट्रायल रूम अशीच असायला हवी!" असे एकानं लिहिलं, तर दुसर्‍यानं म्हटलं, "यूके, युरोप किंवा अमेरिकेत अशा स्मार्ट ट्रायल रूम उपलब्ध नाहीत हे खरं आहे का?" यावरून भारतातील तांत्रिक प्रगतीची दखल जागतिक स्तरावर घेतली जात असल्याचं स्पष्ट होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com