Breast Cancer Injection: मोठी बातमी! स्तन कर्करोगावरील 4.20 लाखांचे इंजेक्शन यापुढे गोमेकॉत मोफत मिळणार...

गोमेकॉत दरवर्षी सुमारे 15 ते 20 रुग्णांना मोफत इंजेक्शन देण्याचे आरोग्य विभागाचे भविष्यातील धोरण आहे.
Breast Cancer Injection | Vishwajit Rane
Breast Cancer Injection | Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Breast Cancer News

राज्यात महिलांमध्‍ये स्तनाच्‍या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एक लाख महिलांची स्तन कर्करोग स्‍क्रिनिंग पूर्ण केलेले गोवा हे पहिले राज्य ठरले आहे. या एक लाख महिलांपैकी अडीच हजार महिलांमध्ये कर्करोगसदृश गाठी आढळल्या.

या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, सरकारतर्फे कर्करोगावरील इंजेक्शन मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केली होती. आज (4 फेब्रुवारी) गोवा वैद्यकीय महाविद्यालयात Phesgo कंपनीतर्फे बनवलेले स्तन कर्करोगाचे इंजेक्शन गोमेकॉत पहिल्या रुग्णाला देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती देताना मंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, माहितीनुसार, या प्रति इंजेक्शनची किंमत 4.20 लाख असून गोमेकॉत दरवर्षी सुमारे 15 ते 20 रुग्णांना मोफत इंजेक्शन देण्याचे आरोग्य विभागाचे भविष्यातील धोरण आहे.

स्तन कर्करोगावर मोफत इंजेक्शन देणारे गोवा हे पहिले राज्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Prostate Cancer Warning Signs
Chaturgrahi Yoga In Cancer August 2026
Goa Cancer Deaths
Minister addressing the media over the women's free bus travel scheme
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com