असा कसा आटला ‘माये’चा झरा

आईशी भांडण उरकून काढून तिच्यावर हल्ला केला होता. त्या वृद्ध महिलेची आरडाओरडा ऐकून शेजारीपाजारी तिच्या मदतीसाठी धावले होते.
Boy tried to kill his mother with help of screwdriver in goa
Boy tried to kill his mother with help of screwdriver in goaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत आलेल्या मानसिक तणावामुळेच रागाच्या भरात जन्मदाती माता अंजली सुनील दीक्षित हिच्यावरच तिचा पुत्र आकाश याने जीवघेणा हल्ला केल्याचे पोलिस चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. शेटयेवाडा-म्हापसा (Mapusa) येथील अंबिका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अंजली दीक्षित (60) यांच्यावर त्यांच्या 26 वर्षीय पुत्राने शनिवारी सकाळी स्क्रूव ड्राइव्हरच्या साहाय्याने हल्ला करून तसेच तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप आहे.

या प्राणघातक हल्ल्यात त्या गंभीर जखमी होऊन बेशुद्धावस्थेत पडलेल्या त्या महिलेची शेजाऱ्यांनी त्या संशयिताच्या तावडीतून सुटका करून नंतर तिला इस्पितळात दाखल केले होते. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 307 कलमाखाली गुन्हा नोंदवून संशयितास अटक केली होती.

Boy tried to kill his mother with help of screwdriver in goa
मेघगर्जनेसह पावसाने उडवली नरकासुरांची दाणादाण

संशयित आकाश याला म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने आज रविवारी 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. म्हापसा पोलिसांनी न्यायालयाच्या अनुमतीनुसार त्या संशयितास उपचारार्थ मनोरुग्ण इस्पितळात दाखल केले आहे. दरम्यान, या घटनेत जखमी झालेली अंजली या वृद्धेची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.

इच्छा असूनही त्या मातेने विज्ञान शाखेत न पाठवता अभियंता शाखेत शिक्षण घेण्यास भाग पाडल्याने पुत्राच्या मनात मनात राग होता. त्यामुळे तो तिच्यावर अतिशय नाराजही होता. त्यातच परीक्षेतील काही पेपर राहिल्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता.

Boy tried to kill his mother with help of screwdriver in goa
मेघगर्जनेसह पावसाने उडवली नरकासुरांची दाणादाण

आईची इच्छा नाही मानवली...

उपलब्ध माहितीनुसार, संशयित आरोपीची विज्ञान शाखेत प्रवेश करून पुढील शिक्षण घेण्याची इच्छा होती; पण आईने त्यास इंजिअीअरिंगचे शिक्षण घेण्यास भाग पाडले. आवड नसल्याने तो अभ्यासक्रम जड जाऊ लागला. त्यातच त्याचे काही पेपर राहिले. यामुळे तो मानसिक तणावात होता. नापास होण्यास तो आईला जबाबदार धरत होता. त्यामुळे त्याने शुल्लक कारणावरून आईशी भांडण उरकून काढून तिच्यावर हल्ला केला होता. त्या वृद्ध महिलेची आरडाओरडा ऐकून शेजारीपाजारी तिच्या मदतीसाठी धावले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com