Rotary Club Bicholim: ग्रामीण भागांतील संस्थांना मदत करा : मुख्यमंत्री सावंत

Rotary Club Bicholim: कोठंबी येथे स्मार्ट बोर्ड, स्वच्छतागृहांचे अनावरण
pramod sawant
pramod sawantDainik Gomantak

Rotary Club Bicholim

रोटरी क्लब सारख्या संस्‍थांनी ग्रामीण भागांमध्ये सामाजिक, शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करावी.

रोटरी क्लब आज देशात उत्कृष्ट कार्य करत आहेत. डिचोली रोटरी क्लबचे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

कोठंबी येथील टागोर विद्यालयात डिचोली रोटरी क्लबने स्मार्ट बोर्ड आणि दोन स्वच्छतागृहे बांधून दिली आहे. त्याचे अनावरण सावंत यांच्या उपस्थितीत झाले.

pramod sawant
Goa News: ‘क्रिमीलेयर’बाबत तोडगा काढणार; उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांचे आश्‍‍वासन

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संगम फळारी, सचिव विवेक पोपकर, टागोर शैक्षणिक संस्थेचे प्रभारी अध्यक्ष प्रकाश परब, उपसरपंच गौरांगी परब, वल्लभ साळकर, शामा गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रोटरी क्लबचे अध्यक्ष संगम फळारी यांनी क्लबच्या कार्याचा आढावा घेतला. प्रकाश परब यांनी स्वागत केले. शिक्षिका अपूर्वा प्रभू यांनी सूत्रसंचालन केले. प्रीती नाईक यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रांगाझाचे अध्यक्ष दशरथ परब उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com